
JFSL Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील आठवड्यात शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले. सुरुवातीचे काही दिवस जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरसाठी फारसे चांगले गेले नाही. मात्र आता स्टॉक मध्ये सुधारणा होत आहे. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंडाने रिलायन्स समूहाचा भाग असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या सूचीबद्ध कंपनीचे शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. हा संपूर्ण व्यवहार खुल्या बाजारात पार पडला आहे.
मागील काही दिवसापासून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक मध्ये घसरण पहायला मिळत होती. मात्र आज स्टॉकमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली आहे. आज सोमवार दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 1.84 टक्के वाढीसह 218.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एलआयसी कंपनीने यापूर्वीच जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करून गुंतवणूक केली आहे. मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंडने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे 3.72 कोटी शेअर्स खरेदी करून खूप मोठी गुंतवणूक केली आहे.
मोतीलाल ओसवाल यांनी हे शेअर्स खरेदी करारासाठी 754 कोटी रुपये गुंतवले आहे. आता मोतीलाल ओसवाल यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे 0.6 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. मोतीलाल ओसवाल म्युचुअल फंडने एक शेअर खरेदी करण्यासाठी 202.80 रुपये खर्च केले आहे.
मागील पाच दिवस जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सलग लोअर सर्किट लागत होता. आज मात्र स्टॉकमध्ये जोरदार खरेदी होत आहे. मागील आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीतून विलग झाल्यानंतर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्यात आले.
सोमवार ते शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स रोज लोअर सर्किट तोडत होते. जेव्हा जिओ फायनान्शियल कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध करण्यात आले होते, तेव्हा शेअरची किंमत 261.85 रुपये होती. तर मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 212.25 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.