
Jio Finance Share Price | प्रसिद्ध ब्लॅकरॉक फायनान्शिअल मॅनेजमेंट इंक कंपनी आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या (NSE: JIOFIN) संयुक्त उपक्रमाला म्युच्युअल फंड व्यवसायात प्रवेश करण्यास सेबीने अधिकृत तत्त्वत: मान्यता दिल्याने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा शेअर पुन्हा तेजीत येण्याचे संकेत आहेत. तज्ज्ञांनी देखील सेबीच्या या मान्यतेनंतर सकारात्मक परिणाम दिसू शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
जिओ फायनान्शियल शेअरमधील हालचाली
या आठवड्यात रिलायन्स ग्रुपच्या जिओ फायनान्शियल शेअरवर गुंतवणूकदारांची नजर राहणार आहे. शुक्रवारी हा शेअर 1.92% टक्क्यांनी घसरून 338.95 रुपयांवर बंद झाला होता. एक वर्षांपूर्वी हा शेअर 204.25 रुपयांवर होता. आणि तीच 204.25 रुपये किंमत शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी आहे. तर 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 394.70 रुपये होती. सोमवार दिनांक 07 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.32 टक्के घसरून 337.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.
याबाबत कंपनीने काय म्हटले
याबाबत कंपनीने प्रेस नोट मध्ये म्हटले आहे की, सेबीने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला आणि ब्लॅकरॉक फायनान्शियल मॅनेजमेंट इंक कंपनीला सहप्रायोजक म्हणून काम करण्यास मान्यता दिली आहे. तसेच प्रस्तावित म्युच्युअल फंडाची स्थापना करण्यास 3 ऑक्टोबर 2024 च्या अधिकृत पत्राद्वारे मान्यता दिल्याची माहिती प्रसार माध्यमांना दिला आहे. मात्र आता या दोन्ही दिग्गज कंपन्या म्युच्युअल फंड व्यवसायात उतरल्याने आता स्पर्धा अत्यंत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच याचा फायदा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचा शेअरला देखील होईल असे शेअर बाजार तज्ज्ञांनी म्हटले आहे.
उद्देश काय आहे?
याबाबत माहिती देताना कंपनीने म्हटले कि, देशांतर्गत गुंतवणूक सल्लागार सेवांचा प्राथमिक व्यवसाय करणे हा कंपनीचा उद्देश आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 10 रुपयांच्या फेस वॅल्यूच्या ३० लाख इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सब्सक्रिप्शनसाठी 3 कोटी रुपयांची गुंतवणूक कंपनीकडून केली जाणार आहे.
रिलायन्स ग्रुपचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने यापूर्वी मालमत्ता व्यवस्थापन आणि संपत्ती व्यवस्थापनासाठी ब्लॅकरॉकसोबत संयुक्त उपक्रमाची अधिकृत घोषणा केली होती. त्यामुळे आता जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांची विशेष नजर असणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.