7 May 2025 6:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 08 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK IRB Infra Share Price | 49 टक्के कमाई होईल 44 रुपयांच्या शेअरमधून, पैशाने पैसा वाढवा - NSE: IRB
x

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर पुन्हा फोकसमध्ये, मालामाल करणार रिलायन्स ग्रुपचा शेअर - Marathi News

Highlights:

  • Jio Finance Share Price NSE: JIOFIN – जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अं
  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची स्थिती
  • जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉकचा करार
  • 1 वर्षात दिला 50% परतावा
  • कंपनीचे तिमाही परिणाम
Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जागतिक घडामोडींमुळे पुन्हा पाचव्या दिवशी देखील स्टॉक मार्केट घसरला आहे. सोमवारी सकाळी शेअर बाजाराने जोरदार (NSE: JIOFIN) उसळी घेतली, मात्र त्यानंतर बाजार पुन्हा घसरला. सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला. तर दुसरीकडे निफ्टी 200 अंकांनी घसरला. तसेच मिडकॅप निर्देशांकात 1300 अंकांची मोठी घसरण पाहायला मिळाली. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड अंश)

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची स्थिती
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरची किंमत सकाळी 3 टक्क्याने वाढली होती. शेअर बाजार उघडताच हा शेअर 346.90 रुपयांच्या पातळीवर पोहोचला. मात्र त्यांनतर शेअर 1.48 टक्क्यांनी घसरून 333.80 रुपयांवर पोहोचला. दरम्यान, सेबीने रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या म्युच्युअल फंड व्यवसायाला हिरवा कंदील दिल्यानंतर स्टॉक प्राईसमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 0.85 टक्के वाढून 339.20 रुपयांवर ट्रेड करत आहे.

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉकचा करार
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने म्युच्युअल फंड क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी जागतिक दर्जाच्या मालमत्ता व्यवस्थापक ब्लॅकरॉकसोबत भागीदारी करार केली आहे, ज्याला मार्केट रेग्युलेटर सेबीने अधिकृत मंजुरी दिली आहे. दरम्यान, मागील वर्षी जुलैमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक कंपनीने इन्व्हेस्टमेंट सोल्युशन देण्यासाठी 50:50 संयुक्त उपक्रमासाठी करार केला होता.

1 वर्षात दिला 50% परतावा
मागील 1 महिन्याचा विचार केल्यास जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा शेअर नुकसान करणारा ठरला आहे. मागील 1 महिन्यात शेअरने अवघी 1.5% वाढ नोंदवली आहे. तर मागील सहा महिन्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 8 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. परंतु, मागील 1 वर्षाचा विचार केल्यास जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

कंपनीचे तिमाही परिणाम
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत एकूण 13 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. तसेच जून 2024 मध्ये व्याजाचे उत्पन्न 20 टक्क्यांनी घटून 162 कोटी रुपये झाले, तर कंपनीचा खर्च वर्षभरापूर्वीच्या 54 कोटी रुपयांवरून 79 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचा खर्च जून 2024४ मध्ये तिपटीने वाढून 39 कोटी रुपयांवर पोहोचला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Jio Finance Share Price 08 October 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या