
Jio Finance Share Price | शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट गुंतवणूकदार सुद्धा या तारखांवर लक्ष ठेऊन आहेत. रिलायन्स ग्रुपची कंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे (NSE: JIOFIN) दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर होणार आहेत. त्याबाबत महत्वाची अपडेट आली आहे. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
कंपनीकडून तारीख आणि वेळ जाहीर
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्याची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने 11 ऑक्टोबर 2024 रोजी एक्सचेंज रिपोर्टमध्ये याबद्दल माहिती दिली आहे. शुक्रवार 11 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.83 टक्के घसरून 340.95 रुपयांवर पोहोचला होता. सोमवार 14 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.059 टक्के वाढून 341.70 रुपयांवर पोहोचला होता.
दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या NBFC कंपनीने स्टॉक मार्केटला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार १८ ऑक्टोबर २०२४ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल मंजूर केले जातील अशी माहिती दिली आहे. शुक्रवार १८ ऑक्टोबरला स्टॉक मार्केट बंद झाल्यानंतर याबाबत अधिक अपडेट येण्याची शक्यता आहे.
तसेच 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी अनऑडिटेड फायनान्स रिझल्ट्स वर विचार करण्यासाठी आणि मंजूरीसाठी सोमवार 4 नोव्हेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे.
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यांत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा शेअर ७.७६ टक्क्यांनी घसरला आहे. २०२४ या वर्षात शेअरने ४५.५९% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने ५१.६३% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.