
Jio Finance Share Price | शक्रवारी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केटमध्ये सध्या कॉर्पोरेट रिझल्टचा हंगाम (NSE: JIOFIN) सुरू आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपच्या मालकीची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने शुक्रवारी दुसऱ्या तिमाही निकाल जाहीर केले आहेत. (जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश)
कंपनी शेअर तेजीत
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची कंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केट बंद झाल्यानंतर दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करण्यात आले. दुसऱ्या तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर प्राईसवर सोमवारी दिसू शकतो. शुक्रवार 18 ऑक्टोबर रोजी हा शेअर 0.14 टक्के वाढून 329.60 रुपयांवर पोहोचला होता.
शेअरने दिलेला परतावा
मागील १ वर्षात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरने 52.59% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यांत हा शेअर 12.90% घसरला आहे. तर YTD आधारावर या शेअरने 40.52% परतावा दिला आहे.
शेअरचे स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची कंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या नफ्यात आणि महसुलात दुसऱ्या तिमाहीत मोठी वाढ झाली आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शेअरचे स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण झाले होते.
कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची कंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा एप्रिल ते जून 2024 तिमाहीतील 312.63 कोटी रुपयांवरून 100% वाढून 689 कोटी रुपये झाला आहे. वार्षिक आधारावर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात किरकोळ वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा ६६८.१८ कोटी रुपये होता.
कंपनीचा ऑपरेटिंग महसूल वाढला
दुसऱ्या तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा ऑपरेटिंग महसूल वाढून ६९३.५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत ४१७.८२ कोटी रुपये इतका होता. जुलै ते सप्टेंबर 2023 या कालावधीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचा महसूल 608.04 कोटी रुपये होता. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीची एकूण देणी वाढून ५७१५.३३ कोटी रुपयांवरून ७०७८.३९ कोटी रुपये झाली आहेत.
कंपनीची नेटवर्थ
रिलायन्स इंडस्ट्रीज ग्रुपची कंपनी असलेल्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीने ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत आपली एकूण मालमत्ता १,३७,१४४ कोटी रुपये नोंदविली आहे. अंडर रिव्यू (Under Review) कालावधीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न ६९३.८५ कोटी रुपये आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ११११.६७ कोटी रुपये इतके होते.
आनंद राठी ब्रोकरेज फर्म – शेअर टेक्निकल चार्ट
आनंद राठी ब्रोकरेज फर्मचे तज्ज्ञ म्हणाले की, ‘टेक्निकल काउंटरवर ३२५-३२० रुपयांच्या झोनमध्ये शेअरला सपोर्ट दिसू शकतो. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरला 325 रुपयांवर मजबूत सपोर्ट आहे, तर 350 रुपयांवर प्रतिकार आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर ३५० रुपयांच्या वर पोहोचल्यास तो ३६५ रुपयांपर्यंत आणखी वाढू शकतो असा अंदाज आनंद राठी ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. जिओ फायनान्शियल शेअरची शॉर्ट टर्मसाठी ट्रेडिंग रेंज ३२० ते ३६५ रुपये दरम्यान असेल,’ असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.