
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील दोन महिन्यांपासून या कंपनीचे (NSE: JioFinance) शेअर्स 325-340 रुपये ट्रेडिंग रेंजमध्ये व्यवहार करत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 363 रुपये या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 2.34 टक्के वाढीसह 358.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनी अंश)
शेअरने ब्रेकआऊट लेव्हल तोडली
मागील आठवड्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने 350 रुपयेची ब्रेकआऊट लेव्हल तोडली होती. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 400 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. तज्ञांच्या मते, सध्याच्या किमतीवर एंट्री पोझिशन घेणे गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकते. जर या कंपनीचे शेअर्स 370 रुपये किमतीच्या पार गेले तर अल्पावधीत हा स्टॉक 400 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
स्टॉक टेक्निकल चार्टवर मजबूत तेजीचे संकेत
टेक्निकल चार्टवर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. मागील दोन महिन्यांपासून या कंपनीचे शेअर्स कन्सोलिडेशनमध्ये व्यवहार करत होते. आता हा स्टॉक तेजीत येण्यास सज्ज झाला आहे. एप्रिल महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने 394 रुपये ही सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. त्यानंतर या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. या स्टॉकमध्ये होणारी घसरण गुंतवणूकीची संधी म्हणून पहिली पाहिजे, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.