
Jio Finance Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली होती. सलग तीन दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी स्टॉक मार्केटमध्ये मोठी घसरण दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स 300 अंकांच्या घसरणीसह खुला झाला होता, तर निफ्टीत देखील १०० अंकांची घसरण झाली होती. दरम्यान, स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.
जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस कंपनी शेअरची सध्याची स्थिती
शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस कंपनी शेअर 0.45 टक्क्यांनी वाढून 278.05 रुपयांवर पोहोचला होता. जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 394.70 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 237.10 रुपये होती. जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 1,76,907 कोटी रुपये आहे.
जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस शेअरबाबत तज्ज्ञांचा सल्ला
स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्मचे स्टॉक मार्केट तज्ज्ञ कुशल गांधी म्हणाले की, ‘जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस शेअरवर विक्रीचा दबाव कायम आहे. ‘ओव्हरसोल्ड’ मुळे शेअरमध्ये तेजीचे फारसे संकेत दिसत नाहीत. सध्या, जिओ फायनान्शियल्स शेअर त्याच्या ३९४ रुपयांच्या विक्रमी उच्चांका पातळीपेक्षा जवळपास ३० टक्क्यांनी घसरला आहे आणि २००-दिवस आणि ५०-डीएमएसह मूव्हिंग सरासरीपेक्षा कमी आहे, जे नकारात्मक क्रॉसओवर संकेत आहेत. जिओ फायनान्शियल्स शेअरचा ५० आठवड्यांचा मूव्हिंग एव्हरेज कमकुवत होत आहे आणि जी मंदीचे संकेत दर्शवते आहे.
बेंचमार्क निर्देशांकाशी तुलना केल्यास, जिओ फायनान्शियल्स स्टॉकची सापेक्ष ताकद देखील मंदीचे संकेत दर्शवते. त्यामुळे सध्या गुंतवणूदारांनी जिओ फायनान्शियल्स शेअरपासून दूर राहावे असा सल्ला स्टोक्सबॉक्स ब्रोकरेज फर्मच्या तज्ज्ञांनी दिला आहे.
जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस कंपनी शेअरने 1.46% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस कंपनी शेअर 17.52% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 17.49% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 14.64% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 29.77% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर जिओ फायनान्शियल्स सर्व्हिसेस कंपनी शेअर 8.57% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.