12 December 2024 7:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

Demat Account | भारतात डिमॅट खात्यांची संख्या 41 टक्क्यांनी वाढली, सामान्य लोकं मोठ्या प्रमाणात स्टॉक मार्केटकडे वळली - रिपोर्ट

Demat account

Demat Account| कोरोना काळानंतर स्टॉक मार्केटमध्ये मिळालेल्या आकर्षक परताव्यामुळे मागील ऑक्टोबर 2021 या वर्षाच्या तुलनेत ऑक्टोबर 2022 मध्ये भारतात डिमॅट खात्यांची संख्या 41 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या देशात डिमॅट खात्याची संख्या 10.4 कोटी वर पोहोचलो आहे. मागील काही महिन्यांपासून डिमॅट खात्यात हळूहळू वाढ होत आहे .

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने केलेल्या संशोधनानुसार अशी माहिती मिळाली आहे की, ऑगस्ट 2022 या महिन्यापासून नवीन डीमॅट खाते उघडण्याच्या संख्येत सातत्याने घसरण होताना दिसत आहे. ऑगस्ट 2022 मध्ये 26 लाख नवीन देम्या खाती उघडण्यात आले होते. त्यांची संख्या सप्टेंबर 2022 मध्ये 20 लाखावर आली होती, आणि ऑक्टोबर 2022 मध्ये नवीन डिमॅट खात्यांची संख्या 18 लाखांवर आली होती. ऑक्टोबर 2021 मध्ये नवीन डीमॅट खात्यांमध्ये 36 लाख इतकी विक्रमी वाढ पाहायला मिळाली होती.

आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मने माहिती दिली आहे की, नवीन डिमॅट खाती उघडण्याचे प्रमाण कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे या कॅलेंडर वर्षातील जागतिक घटनामुळे शेअर बाजारात कमालीची अस्थिरता पाहायला मिळाली होती. आणि तुलनेने शेअर बाजाराची कमकुवत कामगिरी मुळे नवीन गुंतवणुकदार पैसे लावण्यास घाबरत आहेत. स्टॉक ब्रोकर फर्मने माहिती दिली आहे की, 2021 च्या तुलनेत यावर्षी शेअर बाजारात IPO ची संख्याही कमी झाली आहे. हे देखील एक मुख्य कारण असू शकते. नवीन डीमॅट खात्यांची संख्या लक्षणीय रित्या कमी झाली आहे, या वरून आपण अंदाज लावू शकतो की, शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास लोक घाबरत आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस फर्मने दिलेल्या माहिती नुसार रशिया-युक्रेन संघर्षामुळे जागतिक शेअर बाजारातील अस्थिरता कमालीची वाढली असून जानेवारी 2022 पासून नवीन डिमॅट खाते उघडण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये नवीन डिमॅट खात्यांच्या संख्येत लक्षणीय घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे दिवाळी आणि इतर उत्सवाच्या काळात 18 दिवस कामकाज चालेले होते. तथापि, ऑक्टोबर 2022 मध्ये डिमॅट खात्यांची संख्या 104 दशलक्ष पर्यंत पोहोचली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सध्या डिमॅट खाते उघडण्याच्या प्रमाणात 41 टक्के वाढ झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Demat account has opening has decreased in current financial year as compared with last year on 21 November 2022.

हॅशटॅग्स

#Demat Account(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x