 
						Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअर सतत रिटेल गुंतवणूकदारांच्या चर्चेत असतो. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये सातत्याने घसरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. मागील एक महिन्यात हा शेअर 23.27 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे, मात्र दुसरीकडे स्टॉक मार्केट विश्लेषक या शेअरवर बुलिश असल्याचं पाहायला मिळतंय.
सोमवार, 27 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 4.27 टक्क्यांनी घसरून 234 रुपयांवर पोहोचला होता. मागील आठवड्याभरात हा शेअर 15.55 टक्क्यांनी घसरला आहे. या घसरणीनंतर कंपनीचे एकूण मार्केट कॅप घसरून 1,48,730 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. विशेष म्हणजे एफआयआयच्या विक्रीचा मोठा फटका जिओ फायनान्शियल सर्व्हिसेससह शेअर्सला बसला आहे.
सततच्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांची अधिक वाढली आहे. त्यामुळे आता या शेअर्समधून बाहेर पडावे की अधिक शेअर्स खरेदी करावेत असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. मात्र ट्रेंडलाइनवर विश्लेषकांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअर्सबाबत तेजीचे संकेत दिले आहेत.
ट्रेंडलाइन विश्लेषकांच्या अहवालानुसार
ट्रेंडलाइनवर पाच विश्लेषकांनी दिलेल्या अहवालानुसार हा शेअर सध्याच्या पातळीवरून 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ट्रेंडलाइन रिपोर्टनुसार, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरसाठी 316.50 रुपये ही सरासरी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. म्हणजे सध्याच्या पातळीपेक्षा जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर 30 टक्क्यांनी वाढू शकतो.
कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचा निकाल
तिसऱ्या तिमाहीत जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) २,०५० दशलक्ष रुपयांवर पोहोचला आहे, जे मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत २१.९ टक्क्यांनी कमी आहे. परंतु तिमाही-दर-तिमाही आधारावर त्यात २.५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		