
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. बुधवारी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.24 टक्क्यांच्या घसरणीसह 328.60 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. तर आज हा स्टॉक किंचित वाढीसह व्यवहार करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी जिओ फायनान्शिअल स्टॉक ‘होल्ड’ करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात चांगला वाढू शकतो. ( जिओ फायनान्शिअल कंपनी अंश )
अल्पावधीत या कंपनीच्या शेअर्सने 250 रुपयेवरून 330 रुपये किमतीपर्यंत मजल मारली आहे. आज गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.55 टक्के वाढीसह 330.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना जिओ फायनान्शिअल स्टॉक किमान एक वर्षासाठी होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. मुकेश अंबानी आणि ब्लॅकरॉक यांच्या गुंतवणुकीतून निर्माण झालेली ही कंपनी, दीर्घकाळात गुंतवणुकदारांना मलामाल करू शकते, यात शंकाच नाही.
मागील एका आठवड्यात जिओ फायनान्शिअल कंपनीच्या शेअर्सची किंमत 0.65 टक्के घसरली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 6.38 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. तर मागील सहा महिन्यात हा स्टॉक फक्त 30 टक्के मजबूत झाला आहे. ज्या लोकांनी एका वर्षापूर्वी जिओ फायनान्शिअल स्टॉक खरेदी केला होता, त्यांचे पैसे आता 32 टक्के वाढले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.