7 May 2025 11:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 07 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | 30 टक्के परतावा देईल टाटा पॉवर स्टॉक, स्वस्तात मिळतोय, संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | एक-दोन नव्हे! तब्बल 43 टक्के परतावा मिळेल, फक्त 82 रुपयांचा शेअर खरेदी करा - NSE: NHPC IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
x

Jio Finance Share Price | संधी सोडू नका! जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा

Jio Finance Share Price

Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिस स्टॉक सध्या गुंतवणुकदार आणि तज्ञांच्या नजरेत आला आहे. अनेक तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्प कालावधीत 5 ते 6 टक्क्यांपर्यंत सहज परतावा कमावून देऊ शकतो. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 0.80 टक्क्यांच्या वाढीसह 331.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी जिओ फायनान्स सर्व्हिस स्टॉक 0.39 टक्के वाढीसह 324.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिस कंपनी अंश )

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही एक वित्तीय सेवा प्रदाता कंपनी आहे. ही कंपनी मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा (Jio Financial Services Share Price) भाग होती. नंतर ती स्वतंत्र युनिट म्हणून शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आली आहे. या कंपनीचे शेअर्स ऑगस्ट 2023 मध्ये भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध करण्यात आले होते. चार महिन्यांपूर्वी जिओ फायनान्शियल सर्व्हिस कंपनीने संपत्ती व्यवस्थापन आणि स्टॉक ब्रोकिंग व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स प्रचंड तेजीत वाढत होते.

तसेच जिओ फायनान्शिअल कंपनीने भारतात संपत्ती व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी BlackRock Inc सोबत करार केला आहे. तसेच जिओ फायनान्स सर्व्हिस कंपनीने BlackRock Advisors Singapore Pte सह करार करून संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जिओ फायनान्स सर्व्हिस कंपनीच्या मते, कंपनी ब्रोकरेज सेवा, स्टॉक, बाँड्स, म्युच्युअल फंड आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देणे यासारख्या कामात सक्षम आहे.

शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 346 रुपये किमतीवर जाऊ शकतात. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 320 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. जिओ फायनान्स सर्व्हिस कंपनीचे शेअर्स 262 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 394.70 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 204.55 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,09,086.58 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Finance Share Price NSE Live 14 August 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jio Finance Share Price(76)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या