
Jio Finance Share Price | शुक्रवारी स्टॉक मार्केटमधील दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले होते. शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर 2.89 टक्क्यांनी घसरून 280.90 रुपयांवर पोहोचला होता. दरम्यान, स्टॉक मार्केट विश्लेषकांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअरबाबत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर संवाद साधताना फिनव्हर्जन ब्रोकरेज फर्मच्या स्टॉक मार्केट तज्ज्ञ ध्वनी पटेल यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी शेअरबाबत गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला दिला आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरबाबत तज्ज्ञांचे मत
ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर सल्ला देताना फिन्व्हर्सिफाय ब्रोकरेज फर्मच्या मार्केट तज्ज्ञ ध्वनी पटेल म्हणाल्या की, ‘लॉन्ग टर्मच्या दृष्टिकोनातून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर सकारात्मक कामगिरी करू शकतो. मात्र, यात एक अडचण अशी आहे की, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरमध्ये सातत्याने घसरण दिसून येत आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरसाठी पुढचा सपोर्ट लेव्हल २७० रुपयांवर आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरसाठी स्ट्रॅटेजी
स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरसाठी २७० रुपयांवर स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ध्वनी पटेल पुढे म्हणाल्या की, ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरसाठी 270 किंवा त्यापेक्षा जास्त बेस फॉर्मेशन आहे, त्यामुळे गुंतवणूकदार एव्हरेज करू शकतात.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने किती परतावा दिला
गेल्या 1 आठवड्यात हा शेअर 7.63% घसरला आहे. गेल्या 1 महिन्यात हा शेअर 18.10% घसरला आहे. मागील 6 महिन्यांत हा शेअर 19.29% घसरला आहे. मागील 1 वर्षात या शेअरने 11.67% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 30.96% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 6.89% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.