
Jio Finance Share Price | स्टॉक मार्केट गुंतवणूकदारांसाठी मंगळवार नुकसान करणारा ठरला आहे. स्टॉक मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारी मोठ्या घसरणीसह बंद झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मंगळवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्स 1064.12 अंकांनी घसरून 80,684.45 वर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 332.25 अंकांच्या घसरणीसह 24,336 वर बंद झाला होता. दरम्यान, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर ब्रेकआऊट देऊ शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत. (जिओ फायनान्शियल कंपनी अंश)
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर ब्रेकआऊट देणार
दैनंदिन चार्टनुसार जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊटच्या पातळीजवळ ट्रेड करतोय. चार्टनुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी शेअर २०० दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या खाली गेला होता. त्या पातळीवरून सुद्धा शेअर प्राईस २०० डीएमएच्या आसपास होती. जिओ फायनान्शियल स्टॉकचा मोमेंटम इंडिकेटर देखील तेजीच्या झोनमध्ये आहे. एकंदरीत चार्ट पॅटर्न संकेतानुसार जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊटच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी जिओ फायनान्शियल शेअरबाबत ‘HOLD’ रेटिंग दिला आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर टार्गेट प्राईस
स्टॉक मार्केट तज्ज्ञ पुढे सल्ला देताना म्हणाले की, ‘जिओ फायनान्शियल शेअरने ३४५ रुपयांची पातळी ओलांडली तरच गुंतवणूकदारांनी नवीन खरेदी करावी. तज्ज्ञांच्या मते जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअर लवकरच ब्रेकआऊट देऊ शकतो असे संकेत दिले आहेत. तसेच गुंतवणूकदारांनी ३४५ रुपयांच्या पातळीवर नवीन खरेदी करताना स्टॉपलॉस ३३५ रुपयांवर ठेवावा असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. तज्ज्ञांच्या मते जिओ फायनान्शियल शेअर ३७५ रुपयांची टार्गेट प्राईस गाठू शकतो.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस शेअरने 56.99% परतावा दिला
गेल्या ५ दिवसात जिओ फायनान्शियल कंपनी शेअरने 0.63% परतावा दिला आहे. गेल्या एक महिन्यात जिओ फायनान्शियल शेअरने 5.63% परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यात जिओ फायनान्शियल शेअर 7.28% घसरला आहे. गेल्या १ वर्षात या शेअरने 40.22% परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 56.99% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.