 
						Jio Financial Services Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शिअल कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 349 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स 394.70 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवरून 11.58 टक्क्यांनी कमजोर झाले आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी अंश )
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये सलग सहा ट्रेडिंग सेशनमध्ये घसरण झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी जिओ फायनान्शिअल स्टॉक 0.78 टक्के घसरणीसह 342.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
टेक्निकल सेटअपवर जिओ फायनान्शिअल स्टॉकमध्ये 348 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर रेझिस्टन्स लेव्हल 370 रुपये किमतीवर पाहायला मिळत आहे. एंजल वन फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉकमध्ये 395 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवरून घसरण झाली आहे.
तज्ञांच्या मते, या स्टॉकमध्ये आणखी घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीत 340-335 रुपये डाऊनसाईड झोनच्या दिशेने जाऊ शकतो. 370 रुपये किंमतीवर जिओ फायनान्शिअल स्टॉकने मजबूत प्रतिकार पातळी निर्माण केली आहे.
Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉक 371 रुपये या मजबूत प्रतिकारासह मंदीचे संकेत देत आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक नजीकच्या काळात 306 रुपये किमतीवर जाऊ शकतो. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉकमध्ये 348 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 370 रुपये किमतीवर प्रतिरोध पाहायला मिळत आहे.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शिअल स्टॉकने 370 रुपये किमतीचा ब्रेकआऊट तोडला तर शेअर 400 रुपये किमतीवर जाऊ शकतो. पुढील एका महिन्यासाठी शेअर्सची अपेक्षित ट्रेडिंग 345 रुपये ते 400 रुपये दरम्यान असेल. जिओ फायनान्शिअल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,22,333.18 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		