
Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स जबरदस्त विक्रीच्या दबावात क्लोज झाले होते. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक सुरुवातीच्या काही तासात तीन टक्क्यांनी घसरला होता. शेअरची किंमत 372 रुपयेवर आली होती. लवकरच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी आपले मार्च 2024 तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश )
शुक्रवार दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 2.22 टक्के घसरणीसह 370 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
या आठवड्यात जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने ब्लॅकरॉक या जगातील सर्वात मोठ्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीसोबत कारार केला आहे. या करारानुसार, दोन्ही कंपन्या भारतीय बाजारपेठेत संयुक्तपणे संपत्ती व्यवस्थापन आणि ब्रोकिंग व्यवसायाची सुरुवात करणार आहेत. त्यामुळे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे.
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड कंपनीतून विलग करण्यात आली आहे. या कंपनीचे शेअर्स 265 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 211 रुपये किमतीवर आला होता. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत महसूल संकलनात 32 टक्के घट नोंदवली होती. यासह कंपनीचा कंसोलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टैक्स सप्टेंबर तिमाहीच्या तुलनेत 56 टक्के कमी झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.