14 June 2024 8:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 14 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 14 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या NBCC Share Price | सरकारी शेअरने अल्पावधीत दिला 900% परतावा, ऑर्डरबुक मजबूत, पुढेही मल्टिबॅगर Reliance Power Share Price | शेअर प्राईस 30 रुपये! 5 दिवसात दिला 34% परतावा, गुंतवणुकीची संधी सोडू नका RVNL Share Price | RVNL स्टॉक देणार ब्रेकआऊट, PSU शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉकबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक 'BUY' करावा की 'Sell'? Reliance Infra Share Price | स्टॉक रॉकेट स्पीडमध्ये परतावा देणार, 5 दिवसात दिला 30% परतावा, खरेदीला गर्दी
x

Jio Financial Services Share Price | स्टॉक हायर हाय पॅटर्नवर, या प्राईसवर ब्रेकआऊटचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Jio Financial Services Share Price

Jio Financial Services Share Price | भारतातील तसेच आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानीं यांच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स मंगळवारी सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहचले होते. त्यानंतर स्टॉक किंचित नफा वसुलीला बळी पडला.

मंगळवारी या कंपनीचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 5.27 टक्के वाढीसह 374.50 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक 2.18 टक्क्यांच्या वाढीसह 363.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 0.68 टक्के घसरणीसह 365.25 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

जिओ फायनान्शिअल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2.31 लाख कोटी रुपये झाले आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 400 रुपये किमतीवर जाऊ शकतात. जेएम फायनान्शियल फर्मच्या तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकने 350 रुपये किमतीवर निर्णायक ब्रेकआउट दिला आहे. हा स्टॉक 350 रुपये किमतीच्या वर टिकला तर पुढील काळात शेअर 400 रुपये किमतीवर जाऊ शकतो.

Hedged.in फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक हायर हाय पॅटर्न प्रमाणे तेजीत वाढत आहे. हा स्टॉक पुढील काळात गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून देऊ शकतो. आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉकने 360 रुपये किमतीवर सपोर्ट निर्माण केला आहे. तर 380 रुपये किमतीवर स्टॉक मजबूत प्रतिकार देत आहे. जर या स्टॉकने 380 रुपये किमतींवर ब्रेकआऊट दिला तर शेअर अल्पावधीत 390 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 350 रुपये ते 400 रुपये दरम्यान असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jio Financial Services Share Price NSE Live 25 May 2024.

हॅशटॅग्स

#Jio Financial Services Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x