 
						JP Power Share Price | जेपी ग्रुपचा भाग असलेल्या जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 19.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील काही महिन्यांपासून जेपी असोसिएट्स आणि जेपी पॉवर कंपनीच्या शेअरने चांगली रिकव्हरी दाखवली आहे. आज गुरूवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 2.23 टक्के वाढीसह 20.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 3.44 टक्के वाढीसह 15.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
JP असोसिएट्स कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना 177 टक्के परतावा कमावून दिला आहे. 4 जानेवारी 2008 रोजी या कंपनीचे शेअर्स 323.23 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.17 रुपये किमतीवर आले होते.
19 मे 2023 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 6.99 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 13 नोव्हेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.35 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात जेपी असोसिएट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 64 टक्के परतावा कमावून दिला आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी जेपी असोसिएट्स कंपनीचे शेअर्स 11.81 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जेपी पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 151 टक्के परतावा कमावून दिला आहे. जयप्रकाश पॉवर व्हेंचर्स कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 151 टक्के परतावा कमावून दिला आहे. 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.64 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 नोव्हेंबर 2023 रोजी जेपी पॉवर कंपनीचे शेअर्स 14.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील 8 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 173 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.18 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात जेपी पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 15.15 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.17 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		