
JTL Industries Share Price | जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5.6 टक्के वाढीसह 112.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. जेटीएल इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः स्टील ट्यूब मॅन्युफॅक्चरिंग, ब्लॅक पाईप्स, प्री गॅल्वनाइज्ड आणि गॅल्वनाइज्ड स्टील पाईप्स, मोठ्या व्यासाचे पाइप बनवण्याचा व्यवसाय करते. आज बुधवार दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी जेटीएल इंडस्ट्रीज स्टॉक 2.03 टक्के घसरणीसह 210.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( जेटीएल इंडस्ट्रीज कंपनी अंश )
जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या विक्रीमध्ये वाढ झाली असून कंपनीने 3.41 लाख मेट्रिक टन विक्री साध्य केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कंपनीच्या विक्रीत 42 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. सध्या जेटीएल इंडस्ट्रीज कंपनी कर्जमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने नाविन्यपूर्ण DFT तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची घोषणा केली आहे.
सेबीला दिलेल्या माहितीत कंपनीने कळवले आहे की, कंपनीने 2023-24 या आर्थिक वर्षात विक्रमी विक्री सध्या केली आहे. कंपनीच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या वार्षिक विक्रीचे प्रमाण 34 टक्के वाढून 99818 मेट्रिक टनवर पोहचले आहे. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने सेबीला कळवले आहे की, कंपनीने डीएफटी प्लांट सुरू करण्याची योजना आखली आहे.
जीटीएल इंडस्ट्रीज या स्मॉलकॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3770 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 278 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 151 रुपये होती. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 17 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मात्र, मागील एका वर्षात या कंपनीचे शेअर 32 टक्के वाढले आहेत.
जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला कॅपेक्स प्लॅन जाहीर केला होता. त्यानुसार कंपनीने डीएफटी मशीनचा पुरवठा करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. हा डीएफटी प्लांट सुरू झाल्यानंतर, जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल. ही कंपनी आणखी मोठ्या व्यासाचे पाईप्स तयार करण्यासाठी सक्षम होईल. जेटीएल इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी मूल्यवर्धित पोलाद उत्पादन करते. उत्पादन क्षमता वाढीनंतर या कंपनीच्या महसूल आणि नफ्यात मजबूत वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.