 
						JTL Industries Share | JTL इंडस्ट्रीज या लोखंड आणि स्टील पाईप बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने अवघ्या तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. अनेक ब्रोकरेज फर्मने JTL इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी 5.35 टक्के वाढीसह 359.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
तज्ज्ञांचे मत
डोमेस्टिक ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने JTL इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. स्ट्रॅटेजिकली स्थित प्लांट्स, आक्रमक क्षमता विस्तार आणि मूल्य वाढ योजनेद्वारे JTL इंडस्ट्रीज कंपनीच्या वितरकांची विस्तृत पोहोच आहे.
भारतात एकूण चार उत्पादन सुविधा केंद्र
JTL इंडस्ट्रीज कंपनीकडे भारतात एकूण चार उत्पादन सुविधा केंद्र आहेत. या सुविधेमुळे कंपनी स्पर्धात्मक आणि परवडणाऱ्या किमतीत आपल्या ग्राहकांना कच्च्या मालाचा पुरवठा करते. तसेच JTL इंडस्ट्रीज कंपनीची देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ही पोहोच आहे. कंपनी जगभरात आपल्या ग्राहकांना उत्पादन विक्री आणि सेवा प्रदान करते.
जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.03 टक्क्यांच्या वाढीसह 355 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,100 कोटी रुपये आहे. जेटीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स सप्टेंबर 2022 मध्ये 185.70 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. त्यांनतर हा स्टॉक 98 टक्क्यांनी वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे.
3 वर्षापूर्वी म्हणजेच कोविड 19 महामारीत हा स्टॉक 16 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 21.04 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात शेअरची किंमत 15.33 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		