15 December 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

Kamdhenu Share Price | कामधेनू शेअरने एका दिवसात 11% परतावा दिला, फ्री बोनस शेअर्स सुद्धा जाहीर, रेकॉड डेट पाहून फायदा घ्या

Kamdhenu Share Price

Kamdhenu Share Price| कामधेनू व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर धारकांसाठी खुश खबर आली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. कामधेनू व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर एक अतिरिक्त शेअर मोफत मिळणार आहे.

सेबीला दिलेल्या माहितीत कामधेनू व्हेंचर्स लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, संचालक मंडळाच्या बैठकीत कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 रुपये दर्शनी मूल्याच्या शेअरवर गुंतवणूकदारांना 1 बोनस इक्विटी शेअर मोफत दिला जाईल.

शेअरधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनी रेकॉर्ड तारीख निश्चित करेल. बोनस शेअर्स इश्यूची बातमी येताच कामधेनू व्हेंचर्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स एका दिवसात 11 टक्के वाढले, ते शेअरची किंमत 277.80 रुपयेवर पोहचली होती.

शेअर बाजारातील कंपन्या आपल्या स्टॉकची तरलता वाढवण्यासाठी आणि शेअरची किंमत कमी करण्याच्या उद्देशाने शेअर धारकांना मोफत बोनस शेअर वाटप करत असतात. बोनस शेअर्स हे पूर्ण पेड अप असतात. बोनस शेअर्सचे प्रमाण कंपनी निश्चित करते. गुंतवणूकदारांकडे जेवढे शेअर्स असतात, त्यावर कंपनी त्यांना मोफत शेअर्स देते.

कामधेनू व्हेंचर्स ही कंपनी सजावटीचे पेंट बनवण्याचे काम करते. कामधेनू व्हेंचर्स लिमिटेड कंपनीच्या उत्पादन श्रेणीमध्ये इमल्शन, अॅक्रेलिक डिस्टेम्पर, वॉटर बेस्ड आणि सॉल्वेंट प्राइमर्स, सिंथेटिक आणि जीपी इनॅमल, वुड फिनिश, अॅल्युमिनियम पेंट आणि टेक्स्चर्ड आणि डिझायनर फिनिश सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kamdhenu Share Price today on 29 June 2023.

हॅशटॅग्स

Kamdhenu Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x