4 May 2025 2:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Jyoti CNC Automation IPO | मोठी संधी! ज्योती सीएनसी ऑटोमेशन IPO गुंतवणुकीसाठी खुला होतोय, शेअर प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या

Jyoti CNC Automation IPO

Jyoti CNC Automation IPO | मागील काही महिन्यांपासून भारतीय शेअर बाजारात एकामागून एक IPO लाँच होण्याचा सपाटा सुरू आहे. अनेक कंपन्या आपला IPO शेअर बाजारात लाँच करत असून गुंतवणुकदारांना बंपर परतावा देत आहे. सध्या जे तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही ज्योती सीएनसी ऑटोमेशन लिमिटेड कंपनीच्या IPO वर लक्ष ठेवले पाहिजे. गुजरात स्थित ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनी लवकरच आपला आयपीओ लॉन्च करणार आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे कागदपत्र सादर केले आहेत. (Jyoti CNC Share Price)

ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनी आपल्या IPO मध्ये फ्रेश शेअर्स जारी करणार आहे. या IPO मध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर्स विकले जाणार नाही. ही कंपनी IPO लाँच करण्यापूर्वी प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे 200 कोटी रुपये भांडवल उभारण्याची तयारी करत आहे. असे केल्यास आयपीओचे मूल्य थोडे कमी होईल. IPO मधून जमा होणारे पैसे कंपनी कर्ज फेडण्यासाठी, कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सामान्य कॉर्पोरेट हेतूंची पूर्तता करण्यातही खर्च करणार आहे. ज्योती सीएनसी ही कंपनी सीएनसी मशीनची निर्माता कंपनी आहे.

ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत इस्रो, ब्रह्मोस एरोस्पेस तिरुवनंतपुरम लिमिटेड, तुर्की एरोस्पेस, युनिपार्ट्स इंडिया लिमिटेड, टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड आणि बॉश लिमिटेड यांसारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत. ज्योती सीएनसी ऑटोमेशन कंपनीच्या IPO मध्ये इक्विरस कॅपिटल, ICICI सिक्युरिटीज, SBI कॅपिटल मार्केट्स मर्चंट बँकर्स म्हणून भूमिका पार पडणार आहेत.

30 जून 2023 रोजी ज्योती CNC कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 3,143.06 कोटी रुपये होता. ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही कंपनी आर्थिक वर्ष 2022-2023 मध्ये प्रॉफिटमध्ये होती. मागील वर्षी कंपनीला 48.3 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Jyoti CNC Automation IPO 04 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Jyoti CNC Automation IPO(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या