 
						Jyoti Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्योती लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 46.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील काही दिवसांपासून या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. ज्योती लिमिटेड कंपनीच्या शेअरने अवघ्या पाच आपल्या गुंतवणुकदारांना 23.34 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 19.27 टक्के वाढली आहे आणि मागील 6 महिन्यांत ज्योती लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 182.72 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 107 कोटी रुपये आहे. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी ज्योती लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.09 टक्के वाढीसह 48.09 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
गुरुवार दिनांक 11 मे 2023 रोजीज्योती लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून ज्योती लिमिटेड कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे. नुकताच ज्योती लिमिटेड कंपनीने सेनी दिलेल्या माहितीत कळवले आहे की, त्यांना मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीकडून 41 कोटी रुपये मूल्याची एक ऑर्डर प्राप्त झाली आहे.
या ऑर्डरमध्ये 32 टर्बाइन पंपांचे डिझाइन, उत्पादन, पुरवठा आणि पर्यवेक्षण करण्याचे काम देण्यात आले आहे. या ऑर्डरची पूर्तता 30 सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित आहे. ज्योती लिमिटेड ही कंपनी मुख्यतः हायड्रोलिक आणि इलेक्ट्रिकल उत्पादने, डिझाईन, पंप आणि ईपीसी सिस्टम संबंधित वस्तू उत्पादन करण्याचे काम करते.
मागील महिन्यात देखील 11 ऑगस्ट रोजी ज्योती लिमिटेड कंपनीने 13.70 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाल्याची सूचना सेबीला कळवली होती. ही ऑर्डर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीने हरियाणा राज्यातील पानिपतमध्ये बस डक्ट, स्पेअर आणि कंडिशनिंग मॉनिटरिंग सिस्टमसह हाय व्होल्टेज स्विचगियर पॅनेलचा पुरवठा करण्यासाठी दिली होती.
ज्योती लिमिटेड कंपनीने मागील 1 वर्षात मल्टीबॅगर आपल्या शेअर धारकांना श्रीमंत केले आहे. 25 ऑगस्ट 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 10.42 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 25 ऑगस्ट 2023 रोजी हा स्टॉक 46 रुपये किमतीवर पोहचला आहे. अवघ्या एका वर्षात ज्योती लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 300 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		