20 May 2024 12:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी आणि टाटा पॉवर शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, टार्गेट प्राइस जाहीर Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना मजबूत व्याज देणाऱ्या 5 बँकांच्या FD योजना, मिळेल 9.60% पर्यंत व्याज IRFC Share Price | IRFC स्टॉकच्या टेक्निकल चार्टवर राऊंडिंग बॉटम पॅटर्न, शेअर्स BUY करावे की Sell? Mutual Fund SIP | केवळ 5,400 रुपयांची SIP बचत करोडमध्ये परतावा देईल, अशी करा गुंतवणूक SBI FD Interest Rates | SBI ग्राहकांनो! FD व्याजाचे नवे दर समजून घ्या, अन्यथा नुकसान, सर्व ग्राहकांना लाभ नाही Numerology Horoscope | 20 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 20 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Ratnaveer Precision IPO | आयपीओ मालामाल करणार! 93 रुपयाचा शेअर पहिल्याच दिवशी 61 टक्के परतावा देऊ शकतो, GMP वेगात

Ratnaveer Precision IPO

Ratnaveer Precision IPO | काही दिवसांपूर्वी रत्नवीर प्रिसिजन कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. अवघ्या दोन दिवसात या कंपनीचा IPO 90.58 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग कंपनीचा IPO सोमवार दिनांक 4 सप्टेंबर 2023 ते 6 सप्टेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला शेवटच्या म्हणजेच तिसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात बोली प्राप्त झाली होती. (Ratnaveer Precision Share Price)

रत्नवीर प्रिसिजन कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 53.77 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. NII साठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 135.17 पट अधिक खरेदी करण्यात आला होता. तर आणि QIB च्या राखीव कोट्यासाठी 133.05 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. रत्नवीर प्रिसिजन कंपनीच्या IPO मध्ये ऑफर करण्यात आलेल्या 1,17,88,000 शेअर्सवर 1,10,60068,750 शेअर्सची बोली प्राप्त झाली होती.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 58,94,000 शेअर्सवर 31,70,01,900 शेअर्सची बोली प्राप्त झाली होती आणि रत्नवीर प्रिसिजन इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनीच्या IPO मध्ये गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या 25,26,000 शेअर्सवर 34,14,50,250 शेअर्सची बोली प्राप्त झाली होती. रत्नवीर प्रिसिजन कंपनीच्या IPO मध्ये QIB साठी राखीव ठेवण्यात आलेल्या 33,68,000 शेअर्सच्या तुलनेत 44,81,16,600 शेअर्सची बोली प्राप्त झाली होती.

ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ञांच्या मते रत्नवीर प्रिसिजन कंपनीचे IPO शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 60 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत. ग्रे मार्केटचा आढावा घेणाऱ्या तज्ज्ञांच्या मते बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रत्नवीर प्रिसिजन शेअर्सची GMP 60 रुपये होती. IPO ची किंमत बँड आणि ग्रे मार्केट प्रीमियम किंमत विचारात घेता, हा स्टॉक 158 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. म्हणजेच स्टॉक लिस्टिंगमध्ये गुंतवणुकदारांना 61.22 टक्के नफा मिळू शकतो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ratnaveer Precision IPO for investment on 07 September 2023.

हॅशटॅग्स

Ratnaveer Precision IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x