30 April 2025 8:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Kaka Industries IPO | कमाईची सुवर्ण संधी! काका इंडस्ट्रीज आयपीओ लाँच झाला, IPO तपशील जाणून घ्या, ग्रे मार्केट किंमत पाहून घ्या

Kaka Industries IPO

Kaka Industries IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून बंपर कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. आज पासून काका इंडस्ट्रीज या पीव्हीसी दरवाजे बनवणाऱ्या कंपनीचा IPO शेअर बाजारात खुला करण्यात आला आहे. कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 55-58 रुपये प्रति शेअर जाहीर केली आहे. हा IPO 12 जुलै 2023 रोजी बंद केला जाईल. काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. या इंडेक्सवर लघु आणि मध्यम उद्योगांचे शेअर्स सूचीबद्ध केले जातात. (Kaka Industries Share Price)

काका इंडस्ट्रीज कंपनी आपल्या IPO द्वारे 36.60 लाख इक्विटी शेअर खुल्या बाजारात विकणार आहे. कंपनीने आपल्या IPO च्या माध्यमातून अप्पर किंमत बँडवर शेअर विक्रीद्वारे 21.23 कोटी रुपये भांडवल उभारणीचे लक्ष निश्चित केले आहे. काका इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉटमध्ये 2,000 शेअर्स ठेवले आहेत. तज्ञांच्या मते ग्रे मार्केटमध्ये काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 40 रुपये अधिक किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ हा स्टॉक 90 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतो.

वाटप आणि यादी :

काका इंडस्ट्रीज कंपनी आपल्या IPO शेअर्सचे वाटप 17 जुलै 2023 रोजी करेल. ज्या गुंतवणूकदारांना IPO शेअर्स मिळाले नाही, त्यांना 18 जुलै 2023 रोजी पैसे परत केले जातील. काका इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 20 जुलै 2023 रोजी BSE SME इंडेक्सवर सूचीबद्ध केले जातील. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला IPO रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

IPO लिस्टिंगनंतर काका इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तकांचे भाग भांडवल 95.32 टक्केवरून कमी होऊन 69.78 टक्केवर येईल. काका इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवर्तक गटात राजेश धीरूभाई गोंडालिया, भाविन राजेशभाई गोंडालिया आणि राजेशकुमार धीरूभाई गोंडालिया हे आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kaka Industries IPO GMP Today on 10 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Kaka Industries IPO(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या