
Kalyan Jewellers Share Price| शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त खरेदी पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमधे कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीचे शेअर्स 17.16 टक्के वाढीसह 133.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
1 दिवसात कल्याण ज्वेलर्स शेअरने 17.16 टक्के परतावा दिला
एका दिवसात कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीच्या 64 लाख शेअर्सची ट्रेडिंग पाहायला मिळाली होती. एका दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 17.16 तक्के नफा मिळवून दिला आहे.
1 दिवसात 64 लाख शेअरची ट्रेडिंग
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एका दिवसात कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या 64 लाख शेअरची ट्रेडिंग पाहायला मिळाली होती. हे शेअर्स कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 6.2 टक्के आहे. मात्र आतापर्यंत इतक्या मोठ्या डील कोणी केल्या आहेत, याबाबत माहिती मिळाली नाही.
मागील काही महिन्यांपासून कल्याण ज्वेलर्स इंडिया कंपनीचे शेअर्स मंदीच्या गर्तेत अडकले होते, मात्र अचानक इतकी मोठी तेजी पाहून गुंतवणुकदार आणि तज्ञ हैराण झाले आहेत.
मागील 1 महिन्यात कल्याण ज्वेलर्स शेअरने 24.87 टक्के परतावा दिला
मागील एका महिन्यात कल्याण ज्वेलर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 24.87 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 133.10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 3.56 टक्के वाढली आहे. अल्पावधीत या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.