 
						Kenvi Jewels Share Price | ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी एक खुशखबर आली आहे. कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी फायदा देण्याची घोषणा केली आहे. ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे, तसेच कंपनी आपले शेअर्स 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. यासाठी कंपनीने निश्चित केलेली रेकॉर्ड तारीख याच आठवड्यात येणार आहे. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के घसरणीसह 112.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेकॉर्ड तारीख तपशील :
‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत जे निर्णय घेतले, त्याची माहिती सेबीला दिली आहे. ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनी आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 10 भागांमध्ये विभाजित करणार आहे. यासोबतच कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना प्रत्येक 4 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 19 मे 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
तिमाही निकाल प्रलंबित :
‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीने अद्याप आपले चौथ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले नाही. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 118.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात ‘केन्वी ज्वेल्स’ या कंपनीने आपल्या स्थानबद्ध गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.
ज्या गुंतवणूकदारांनी 6 महिन्यांपूर्वी केन्वी ज्वेल्स कंपनीच्या शेअर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 168 टक्के वाढले आहे. मागील एका वर्षात ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 355 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		