Kenvi Jewels Share Price | केन्वी ज्वेल्स शेअर्स गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ, डिटेल्स जाणून घ्या

Kenvi Jewels Share Price | ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. बोनस शेअरची बातमी येताच ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स अपर सर्किट तोडत आहेत.

केन्वी ज्वेल्स शेअरची सध्याची किंमत
आज बुधवार दिनांक 24 मे 2023 रोजी ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीचे शेअर्स 4.59 टक्के वाढीसह 11.40 रुपये किमतीवर (Kenvi Jewels Share Price NSE) ट्रेड करत आहेत. ‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 30 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. (Kenvi Jewels Share Price BSE)

बोनस शेअर्स तपशील :
‘केन्वी ज्वेल्स’ कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनी पात्र गुंतवणूकदारांना प्रति 4 शेअर्स 1 बोनस शेअर देणार आहे. त्याच वेळी कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 भागांमध्ये विभाजित करणार आहे. स्टॉक विभाजनानंतर गुंतवणुकदारांना एका शेअरवर 10 शेअर्स मिळतील.

एका वर्षात 307 टक्के परतावा
केन्वी ज्वेल्स कंपनीने आपल्या शेअर धारकांना एका वर्षात 307.14 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचवेळी YTD आधारे या कंपनीच्या शेअरची किंमत 180.79 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 153.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 8.78 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kenvi Jewels Share Price today on 24 May 2023.