7 May 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Power Share Price | स्वस्त शेअरची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RPOWER Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 08 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Motors Share Price | तुटून पडले गुंतवणूकदार, टाटा मोटर्स शेअर्स खरेदी करा, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK IRB Infra Share Price | 49 टक्के कमाई होईल 44 रुपयांच्या शेअरमधून, पैशाने पैसा वाढवा - NSE: IRB GTL Share Price | धोक्याची घंटा! हा पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, अपडेट आली - NSE: GTLINFRA
x

Khadim India Share Price | या कंपनी व्यवस्थापनतील फेरबदलांमुळे हा शेअर फोकसमध्ये आला, गुंतवणूक करावी का?

Khadim India Share Price

Khadim India Share Price| ‘खादिम इंडिया लिमिटेड’ ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी रिटेल फुटवेअर ब्रँड आहे. या कंपनीने आपल्या कामकाजाचे व्यवस्थापन करण्यासाठी पूर्णवेळ संचालक म्हणून ‘हृतिक रॉय बर्मन’ यांना नियुक्त केले आहे. ‘खादिम इंडिया’ कंपनीने माहिती दिली आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच नेतृत्व बदल करण्यास मंजुरी दिली आहे. हा बदल 24 मार्च 2023 पासून अमलात आला आहे. (Khadim India Limited)

‘हृतिक रॉय बर्मन’ हे ‘खादिम इंडिया लिमिटेड’ कंपनीच्या प्रवर्तक समूहाचे सदस्य असून ते कंपनीचे प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून काम करत होते. ‘हृतिक रॉय बर्मन’ कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ‘सिद्धार्थ रॉय बर्मन’ यांना आपल्या कामाची रेपोर्टिंग करतील. कंपनीच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी नम्रता अशोक चोत्राणी यांनी राजीनामा दिल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात मोठे बदल करण्यात आले आहे.

शेअर्सची कामगिरी :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘खादिम इंडिया’ कंपनीचे शेअर्स बीएसई निर्देशांकावर 194.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 27 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.026 टक्के वाढीसह 195.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ‘खादिम इंडिया लिमिटेड’ कंपनीचे बाजार भांडवल 349.87 कोटी रुपये आहे. या कंपनीचा IPO नोव्हेंबर 2017 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. ‘खादिम इंडिया लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर सवलतीच्या दरात सूचीबद्ध झाले होते. कंपनीमध्ये आपल्या IPO मध्ये स्टॉकची किंमत बँड 745-750 रुपये निश्चित केली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Khadim India Share Price BSE NSE on 27 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Khadim India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या