
KIOCL Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये KIOCL कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटसह 414.95 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळाली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये KIOCL कंपनीचे शेअर्स 476.40 रुपये या इंट्राडे उच्चांक आणि 413.55 रुपये नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, KIOCL कंपनीने मंगळुरूमध्ये पेलेट प्लांट युनिट सुरू केले आहे. जे पेलेट प्लांट युनिट 28 सप्टेंबर 2023 रोजी तात्पुरते बंद करण्यात आले होते. आज बुधवार दिनांक 18 ऑक्टोबर 2023 रोजी KIOCL कंपनीचे शेअर्स 9.53 टक्के घसरणीसह 431.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
स्टॉक तपशील
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअरने जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील पाच दिवसांत KIOCL स्टॉक 46.11 टक्के मजबूत झाला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 131.26 टक्के वाढले आहेत. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 112.35 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरने आतपर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना दिलेला कमाल परतावा 4,230.91 टक्के आहे.
भविष्यातील योजना
KIOCL ही कंपनी कर्नाटक राज्यात खाण व्यवसाय करते. या कंपनीच्या खाणी कर्नाटकमध्ये सांडूर तालुक्यातील बल्लारी या भागात आहे. 2024-2025 मध्ये KIOCL कंपनीने आपल्या खाणीतून वार्षिक 3 लाख टन उत्पादन करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. KIOCL कंपनीने कर्नाटक वन विभागासोबत खणीकर्म प्रक्रिया सुलभ करण्यासाठी CPSE सह भारत सरकारकडे जंगल जमिनीत प्रवेश करण्यासाठी आणि खाणींमध्ये ऑपरेशन सुरू करण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची विनंती केली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.