Kore Digital IPO | कोर डिजिटल IPO किती सबस्क्राईब झाला? शेअरची ग्रे मार्केट प्राईस पहिल्याच दिवशी मोठा परतावा देणार?
Highlights:
- Kore Digital IPO
- शेअरची प्राइस बँड 180 रुपये प्रति शेअर
- कोर डिजिटल IPO GMP
- कोर डिजिटल IPO महत्वाच्या तारखा

Kore Digital IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आली आहे. दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या ‘कोर डिजिटल लिमिटेड’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
कोर डिजिटल लिमिटेड कंपनीचा IPO 2 जून 2023 पासून सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आहे. ही कंपनी कॉर्पोरेट्स आणि टेलिकॉम नेटवर्क ऑपरेटरना संप्रेषण उपाय सेवा प्रदान करण्याचे काम करते. याशिवाय ही कंपनी महाराष्ट्रात मोबाईल टॉवर आणि ऑप्टिकल फायबर केबल सिस्टीम नेटवर्क सुरू करण्याचा व्यवसाय करते.
‘कोर डिजिटल लिमिटेड’ ही एक SME कंपनी आहे. ही कंपनी आपल्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरद्वारे 18 कोटी रुपये भांडवल उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. या इश्यू अंतर्गत, ‘कोर डिजिटल लिमिटेड’ कंपनी प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याचे 10 लाख फ्रेश शेअर खुल्या बाजारात विकणार आहे.
शेअरची प्राइस बँड 180 रुपये प्रति शेअर
कोर डिजिटल कंपनीने आपल्या आयपीओमध्ये शेअरची प्राइस बँड 180 रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे. ‘कोर डिजिटल लिमिटेड’ आपल्या IPO मध्ये एक लॉट अंतर्गत 800 शेअर्स जारी करणार आहे. याचा अर्थ गुंतवणुकदारांना या IPO मध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान 1,44,000 रुपये जमा करावे लागतील.
कोर डिजिटल IPO GMP
‘कोर डिजिटल लिमिटेड’ कंपनीचा IPO स्टॉक शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्रे मार्केटमध्ये सपाट किमतीवर ट्रेड करत होता. म्हणजेच स्टॉक प्रीमियम मध्ये ही नव्हता, आणि सवलतीवर ही ट्रेड करत नव्हता. अशा प्रकारे कोर डिजिटल कंपनीच्या IPO स्टॉकचा GMP सध्या शून्य आहे. ग्रे मार्केटमधील कामगिरी वरुन असे सूचित होते की, या शेअरची लिस्टिंग सपाट राहू शकते.
कोर डिजिटल IPO महत्वाच्या तारखा
‘कोर डिजिटल लिमिटेड’ कंपनी आपल्या IPO शेअरचे वाटप 12 जून पर्यंत पूर्ण करेल. आणि ज्या लोकांना स्टॉक मिळाले नाही, त्यामा रिफंड 13 जूनपासून मिळायला सुरुवात होईल. पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात 14 जूनपर्यंत शेअर्स जमा केले जातील. यानंतर, कंपनीचे शेअर्स 15 जून रोजी NSE SME इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जातील.
‘कोर डिजिटल लिमिटेड’ कंपनीने ‘फर्स्ट ओव्हरसीज कॅपिटल लिमिटेड’ या फर्मला IPO चे लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. त्याच वेळी, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या फर्मला IPO इश्यूचे रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Kore Digital IPO open for investment, check details on 05 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल शेअर सतत अप्पर सर्किट तोडतोय, स्टॉकमधील तेजीचे कारण काय? मल्टिबॅगर परतावा मिळेल
-
Hi-Green Carbon IPO | हाय ग्रीन कार्बन IPO शेअरची प्राईस बँड 71 ते 75 रुपये प्रति शेअर, पहिल्याच दिवशी मिळेल 80% परतावा, GMP पहा
-
Vaibhav Jewellers IPO | आला रे आला IPO आला! वैभव ज्वेलर्स IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार, शेअर प्राईस बँडसह तपशील जाणून घ्या
-
Shashijit Infra Share Price | शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स शेअरची किंमत फक्त 40 रुपये, 1 महिन्यात मजबूत परतावा, खरेदी करावा का?
-
Meson Valves India IPO | लॉटरीच लागली! मेसन वाल्व्स इंडिया IPO शेअरने पहिल्याच दिवशी 90 टक्के परतावा दिला, आता खरेदी करणार?
-
Nirman Agri Genetics Share Price | मार्ग श्रीमंतीचा! फक्त 6 महिन्यात पैसा दुप्पट वाढला, निर्माण अॅग्री जेनेटिक्स शेअर्सची खरेदी वाढली
-
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अलर्ट! महागाई भत्ता वाढीचा निर्णय लांबणीवर पडणार? कर्मचारी व पेशनर्ससाठी महत्वाची अपडेट
-
Amber Enterprises share Price | अंबर एंटरप्रायझेस इंडिया शेअरने अल्पावधीत 400% परतावा दिला, फायद्याचा शेअर पुन्हा मल्टिबॅगरच्या दिशेने?
-
SBI Share Price | तुमच्या भरवशाच्या सरकारी SBI बँकेचा शेअर अल्पावधीत 28 टक्क्यांपर्यंत परतावा देईल, कमाई करणार?
-
DB Realty Share Price | मार्ग श्रीमंतीचा! मागील 6 महिन्यांत डीबी रिअॅल्टी शेअरने 195% परतावा दिला, पुढे अजून मल्टिबॅगर कमाई करा