15 December 2024 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या स्वस्त शेअर्समध्ये बंपर तेजी, एका महिन्यात 65 टक्के परतावा दिला

Highlights:

  • Brightcom Group Share Price
  • ब्राइटकॉम ग्रुप शेअरची किंमत
  • एका महिन्यात 65.68 टक्के परतावा
  • कंपनीबद्दल थोडक्यात
Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | शेअर बाजारात यशस्वी होण्यास एकमात्र मंत्र म्हणजे, मूलभूतदृष्ट्या मजबूत शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे. असे शेअर्स गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. आज या लेखात आपण अशाच एका भरघोस परतावा देणाऱ्या कंपनीच्या स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत.

या कंपनीचे नाव आहे, ब्राइटकॉम ग्रुप. हा स्टॉक मागील काही काळापासून सतत अप्पर सर्किट तोडत आहे. मागील एका महिन्यात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरने लोकांना 112 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ब्राइटकॉम ग्रुप शेअरची किंमत

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांच्या वाढीसह 20.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.87 टक्के वाढीसह 19.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील काही दिवसापासून या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत वाढत आहेत. म्हणून हा स्टॉक शेअर बाजारात चर्चेचा विषय बनला आहे.

एका महिन्यात 65.68 टक्के परतावा

मागील 5 दिवसात ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 9.52 टक्के मजबूत झाले आहेत. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 65.68 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 40.12 टक्के घटली होती.

मागील वर्षभरात या शेअरची किंमत 65 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 59.30 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,158.94 कोटी रुपये आहे.

कंपनीबद्दल थोडक्यात

ब्राइटकॉम ग्रुप कंपनी एक एड-टेक, न्यू मीडिया आणि आयओटी आधारित व्यवसाय चालवते. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या ग्राहकांमध्ये एअरटेल, ब्रिटिश एअरवेज, कोका कोला, ह्युंदाई मोटर्स, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, आयएनजी, लेनोवो, एलआयसी, मारुती सुझुकी, एमटीव्ही यासारख्या दिग्गज कंपन्या सामील आहेत. कंपनीचे संस्थापक सुरेश रेड्डी आणि विजय कंचर्ला हे आहेत.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price today on 05 June 2023.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x