
Zomato Share Price | सध्याच्या स्टॉक मार्केट तेजीत जर तुम्ही दर्जेदार शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत असाल ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. सध्या तुम्ही ऑनलाईन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato कंपनीचे शेअर्स खरेदी करून शकता. हे शेअर्स पुढील काळात कमालीचे वाढू शकतात. झोमॅटो कंपनीच्या स्टॉकबाबत ब्रोकरेज फर्म उत्साही असून त्यांनी स्टॉक खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
Zomato ची पुढील लक्ष किंमत :
कोटक सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी Zomato कंपनीचे शेअर्स पुढील काळात 100 रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. कोटक सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहेत की, Zomato कंपनीने स्विगीपेक्षा मोठा बाजार काबीज केला आहे, त्यामुळे आम्ही झोमॅटो कंपनीच्या शेअर्समधील वाढीबाबत सकारात्मक आहोत. पुढील काळात Zomato कंपनीचे शेअर्स 100 रुपये पर्यंत वाढू शकतात.
झोमॅटोच्या शेअर्सची स्थिती :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Zomato कंपनीचे शेअर्स किंचित वाढीसह 64.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्याची नीचांक पातळी किंमत 40.55 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 148.85 रुपये आहे. सध्या Zomato कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या 57 टक्के स्वस्त किमतीवर ट्रेड करत आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 54.51 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. या चालू आर्थिक वर्षात Zomato कंपनीचा स्टॉक 56 टक्के कमजोर झाला आहे. Zomato चा IPO मागील वर्षी 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.