13 December 2024 1:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

KPI Green Energy Share Price | फ्री शेअर्स मिळवा! मल्टिबॅगर शेअर KPI ग्रीन एनर्जी शेअर्स अल्पावधीत पैसा वाढवतील

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या वाढीसह 1,823.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे.

मार्च 2023 मध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर 388.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 8.54 टक्के वाढीसह 1,976.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने सेबीला कळवले की, त्यांच्या कंपनीच्या पूर्ण मालकीची उपकंपनी KPIG Energia Private Limited ला Skywin Paper Industries Private Limited कंपनीने 5MW क्षमतेचा सोलर पॉवर प्लांट उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे. कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर्स विभागांतील या ऑर्डरमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहे. या ऑर्डरची पूर्तता आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत करायची आहे.

19 जानेवारी रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने सेबीला माहिती दिली की, केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीला कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर विभागांतर्गत 5.60 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा संयंत्र उभारण्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. नुकताच केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीने आपल्या शेअरधारकांना बोनस शेअर्स देखील वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना 1:2 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कंपनीने 15 फेब्रुवारी 2024 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे.

डिसेंबर 2023 पर्यंत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 53.08 टक्के भाग भांडवल होते. त्याच वेळी, सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे जवळपास 46.92 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 635 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एक वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 285 टक्के वाढली आहे. सहामाही, तिमाही आणि मासिक आधारावर देखील या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना सकारात्मक परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 01 February 2024.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x