
KPI Green Energy Share Price | शेअर बाजारात गुंतवणूक करून बोनस शेअर्सचा फायदा घेणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक्स बोनसवर व्यापार करत होते. गुरुवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 3.14 टक्के घसरणीसह 441 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदाराना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. या कंपनीच्या बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट आणि एक्स बोनस तारीख 18 जानेवारी 2023 ही होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KPI Green Energy Share Price | KPI Green Energy Stock Price | BSE 542323 | NSE KPIGREEN)
कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 1 शेअरवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. म्हणजेच एक्स बोनस आणि रेकॉर्ड तारीख पर्यंत ज्या गुंतवणूकदाराचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये होते, त्यांना कंपनी मोफत बोनस शेअर्स वाटप करेल. विशेष म्हणजे केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी ‘T + 1’ सेटलमेंट श्रेणीमध्ये असल्याने कंपनीची एक्स-बोनस तारीख आणि रेकॉर्ड तारीख एकच दिवशी असेल.
शेअर बाजारात कंपनीची कामगिरी :
गुरूवार दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 3.41 टक्क्यांच्या घसरणीसह 441 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 50 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. 6 महिन्यांपूर्वी ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले होते, त्यांना अल्पावधीत 38.76 टक्के नुकसान सहन करावे लागले आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 975 रुपये होती. तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 383.05 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.