12 December 2024 7:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
x

IRB Infra Share Price | स्वस्त IRB शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, यापूर्वी दिला 163% परतावा

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसांत हा शेअर 86 रुपये किमतीवर जाऊ शकतो. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के घसरणीसह 72.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी अंश )

ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 86 रुपये किमतीवर जाऊ शकतो. आज मंगळवार दिनांक 28 मे 2024 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक 1.71 टक्के घसरणीसह 71.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील पाच दिवसांत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स पाच टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील सहा महिन्यांत या कंपनीचे शेअर्स 92 टक्के वाढले होते. YTD आधारे या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 72 टक्के वाढवले आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 163 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 75.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 24.97 रुपये होती.

IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय करते. या कंपनीची स्थापना 1998 साली झाली होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 43,812,95 कोटी रुपये आहे. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 2504.49 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील वर्षीच्या मार्च तिमाहीच्या 2077.29 कोटी रुपयेच्या तुलनेत या तिमाहीत महसूल 20.57 टक्के वाढला आहे. मार्च 2024 तिमाहीत आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने 324.20 कोटी रुपये PAT नोंदवला आहे. मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 34.39 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर FII ने कंपनीचे 47.2 टक्के भाग भांडवल धारण केले होते. DII कडे कंपनीचे 7.78 टक्के भाग भांडवल आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price NSE Live 28 May 2024.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x