
KPI Green Energy Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात प्रचंड घसरण पहायला मिळाली होती. केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स देखील 1 टक्के घसरणीसह 807 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2920 कोटी आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 960 रुपये होती. तर नीचांक परळी किंमत 345 रुपये होती.
KPI ग्रीन एनर्जीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला 4.20 मेगावॉट क्षमतेचा पवन सौर संकरित ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. आज शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.70 टक्के वाढीसह 824.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला सस्टेनेबल स्पिनिंग अँड कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्युसर सेगमेंट अंतर्गत 4.20 मेगावॅट क्षमतेचा पवन ऊर्जा प्रकल्प आणि 3.60 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे. KPI ग्रीन एनर्जी कंपनीने 2023-24 चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.
KPI ग्रीन एनर्जी कंपनीची विक्री 34.5 टक्क्यांच्या वाढीसह 215 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. तर कंपनीचा कामकाजी नफा 36 टक्क्यांच्या वाढीसह 72 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. KPI ग्रीन एनर्जी कंपनीने 64 टक्क्यांच्या वाढीसह 35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
KPI ग्रीन एनर्जी कंपनीकडे 2023-24 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये एकत्रित आधारावर एकूण 33 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प होते. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीची एकत्रित ऊर्जा निर्मिती क्षमता 346 मेगावॅट आहे..चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला 240 मेगावॅट क्षमतेचे DC बेडसह 145 मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. या कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये एकूण 541 मेगावॅट क्षमतेचे काम प्रलंबित आहे.
केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 2025 पर्यंत 1000 मेगावॅट वीज उत्पादन क्षमता साध्य करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे. हा कंपनीने 20 ऑक्टोबर 2023 रोजी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 2.5 टक्के म्हणजेच 25 पैसे लाभांश वाटप केले होते. मागील 1 वर्षात KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 3200 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.