10 December 2024 7:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | तुमच्याकडे सुद्धा एकापेक्षा अधिक पॅन कार्ड आहेत मग, तुमच्या क्रेडिट स्कोरवर होणार हा परिणाम - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेच्या तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत आणि नियमांमध्ये मोठा बदल; ही अपडेट ठाऊक आहे का Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर मालामाल करणार, स्टॉक चार्टवर संकेत, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या Redmi Note 14 | Redmi Note 14 सिरीजची भारतात एंट्री; या तारखेपासून खरेदी करता येईल, किंमत आणि फीचर्स पाहून घ्या IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO BSNL Recharge | आता केवळ 58 रुपयांपासून मिळणार BSNL चे स्वस्तात स्वस्त प्लान; मोबाईल रिचार्जसाठी लक्षात ठेवा
x

Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपची कंपनी असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल (NSE: TATATECH) निराशाजनक राहिले आहेत. दुसऱ्या तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीच्या नफ्यात किंचित घट झाली आहे. त्यामुळे मंगळवारी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली होती. मात्र टाटा टेक्नॉलॉजीज शेअरबाबत तज्ज्ञांनी सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे. (टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी अंश)

कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा निव्वळ नफा 1.85 टक्क्यांनी घसरून 157.41 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीला १६०.३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने सांगितले की, दुसऱ्या तिमाहीत कामकाजातून मिळालेले उत्पन्न 1,296.45 कोटी रुपये होते, जे मागील वर्षी याच तिमाहीत 1,269.17 कोटी रुपये होते. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, दुसऱ्या तिमाहीत एकूण खर्चात किरकोळ वाढ होऊन तो 1,095.40 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

शेअरची सध्याची स्थिती
बुधवार 30 ऑक्टोबर रोजी टाटा टेक्नॉलॉजीज शेअर 0.69 टक्के वाढून 1,006.65 रुपयांवर पोहोचला होता. नोव्हेंबर २०२३ मध्ये टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरचा भाव १४०० रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. आणि तोच शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक होता. ऑगस्ट २०२४ मध्ये हा शेअर 970 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 40,879 कोटी रुपये आहे.

जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्म – BUY रेटिंग
जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शियल ब्रोकरेज फर्मने टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरची जुनी टार्गेट प्राईस १३०० रुपयांवरून आता १२९० रुपये केली आहे.

इंक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्म
इंक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल अंदाजापेक्षा कमी आहेत. त्यामुळे इंक्रेड इक्विटीज ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ७४० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर 5.64% घसरला आहे. मागील १ वर्षात हा शेअर 23.31% घसरला आहे. तसेच YTD आधारावर हा शेअर 14.69% घसरला आहे.

कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्न
टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा ५५.२२% आहे. पब्लिक शेअरहोल्डर्सचा हिस्सा ४४.७८% आहे. प्रवर्तक टाटा मोटर्सकडे 21,65,69,816 म्हणजेच 53.39% शेअर्स आहेत.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price 30 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x