
L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून चर्चेत आले आहेत. नुकताच लार्सन अँड टुब्रो कंपनीला पश्चिम किनारपट्टीवरील पाइपलाइन बदलण्याचशी संबंधित असलेल्या प्रकल्पाच्या आठव्या टप्प्यासाठी ONGC कंपनीने ऑर्डर दिली आहे. या ऑर्डर अंतर्गत लार्सन अँड टुब्रो कंपनीला भारताच्या पश्चिम किनापट्टीजवळील ONGC कंपनीच्या ऑफशोअर फील्डमध्ये अभियांत्रिकी, खरेदी, बांधकाम, स्थापना आणि कमिशनिंग आणि 129 किमीच्या उपसमुद्री पाइपलाइनच्या संबंधित सुधारणांचे काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ( लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश )
लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स सोमवारी 0.57 टक्क्यांच्या घसरणीसह 3528.20 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मंगळवारी हा स्टॉक 0.45 टक्क्यांच्या वाढीसह 3,540.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,85,073.91 कोटी रुपये आहे. आज बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 0.098 टक्के घसरणीसह 3,622.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
ब्रोकरेज हाऊस UBS ने लार्सन अँड टुब्रो स्टॉकवर 4180 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या ऑर्डर इनटेकमध्ये वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी कंपनीच्या मार्जिनमध्ये चांगली वाढीची अपेक्षा आहे.
मागील एका महिन्यात लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअरची किंमत 3.81 टक्के घसरली होती. तर मागील तीन महिन्यांत शेअरची किंमत 8.06 टक्क्यांनी खाली आली होती. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स फक्त 0.15 टक्क्यांनी वाढले आहेत. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 42.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षात लार्सन अँड टुब्रो स्टॉक 124.76 टक्के आणि तीन वर्षात 136.40 टक्के वाढला आहे.
मागील पाच वर्षात लार्सन अँड टुब्रो स्टॉक 126.60 टक्के आणि 10 वर्षात 206.54 टक्के वाढला आहे. जून 2024 मध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना प्रति शेअर 28 रुपये लाभांश वाटप केला होता. मागील वर्षी या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना प्रति शेअर 24 रुपये सर्वसाधारण लाभांश आणि 6 रुपये विशेष लाभांश वाटप केला होता. 2021 मध्ये या कंपनीने 18 रुपये आणि 2022 मध्ये 22 रुपये लाभांश वाटप केला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.