
L&T Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सेन्सेक्स निर्देशांक 73466 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 22314 अंकांवर क्लोज झाला होता. दरम्यान निफ्टी मिडकॅप 100 आणि बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक तेजीत व्यवहार करत होते. आणि निफ्टी ऑटो आणि निफ्टी एफएमसीजी निर्देशांक हिरव्या निशाणीवर क्लोज झाले होते. दिवसाअखेर निफ्टी आयटी, निफ्टी बँक, निफ्टी फार्मा आणि निफ्टी फायनान्शियल सर्व्हिस निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली होती. ( लार्सन अँड टुब्रो लिमिटेड कंपनी अंश )
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टॉप गेनर्स लिस्टमध्ये बीपीसीएल, कोल इंडिया, पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, एसबीआय, एनटीपीसी आणि ओएनजीसी कंपनीचे शेअर्स सामील होते. तर टॉप लुजर्स स्टॉकमध्ये डॉ. रेड्डीज, एशियन पेंट्स, एचयूएल, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्स आणि एसबीआय या कंपन्यांचे शेअर्स सामील होते.
लार्सन अँड टुब्रो लिमिटेड ही भारतातील आघाडीची अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 1 टक्के वाढीसह 3454 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. लार्सन अँड टुब्रो या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.75 लाख कोटी रुपये आहे.
लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3860 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी किंमत 2168 रुपये होती. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 155 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 9 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.90 टक्के घसरणीसह 3,316 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
3 एप्रिल 2020 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 775 रुपये किमतीवर आले होते. या किमतीवरून हा स्टॉक आतापर्यंत 350 टक्के वाढला आहे. नुकताच लार्सन अँड टुब्रो कंपनीला पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन क्षेत्रात फ्लोटिंग सोलर प्लांट्स उभारण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या दोन्ही सोलर पॉवर प्लांटची क्षमता 150 मेगावॅट होती. यासह कंपनीला 120 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटन सोलर पीव्ही प्रोजेक्ट उभारण्याचे काम देखील मिळाले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.