
Lemon Tree Hotels Share Price | लेमन ट्री हॉटेल्स या हॉटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. कोरोना महामारीमुळे या कंपनीचे शेअर्स देखील कोसळले होते. परंतु त्यांनी मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 550 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
लेमन ट्री हॉटेल्स शेअरची सध्याची किंमत आणि टार्गेट प्राईस
आज मंगळवार दिनांक 6 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.59 टक्के घसरणीसह 93.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मार्च 2023 तिमाहीत लेमन ट्री हॉटेल्स कंपनीने चांगली कामगिरी केली आहे. ही कंपनीची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी असलेली तिमाही होती. म्हणून शेअर बाजारातील तज्ञांनी या कंपनीच्या शेअरवर 137 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.
लेमन ट्री हॉटेल्स शेअरने 2 वर्षांत दिला 550 टक्के परतावा
20 मे 2020 रोजी म्हणजेच कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत लेमन ट्री हॉटेल्स कंपनीचे शेअर्स 14.45 रुपये किमतीवर आले होते. नंतर परिस्थिती सामान्य होताच पर्यटन उद्योग पुन्हा रुळावर आल्याने कंपनीचा व्यवसायही पुन्हा रुळावर येऊ लागला. आणि अवघ्या दोन वर्षात लेमन ट्री हॉटेल्सचे शेअर्स 550 टक्क्यांनी वाढले. आता हा स्टॉक 93 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ मागील फोन वर्षात लेमन ट्री कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे.
सहा महिन्यांत 77 टक्के परतावा
मागील एका वर्षातील शेअर्समधील चढ-उतारांचे निरीक्षण केल्यास आपल्याला समजेल की, मागील वर्षी 20 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 58.30 रुपये या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यानंतर अवघ्या सहा महिन्यांत हा स्टॉक 77 टक्क्यांनी वाढून 103.30 रुपये हा विक्रमी उच्चांक पातळीवर पोहोचला होता. मात्र मागील एका आठवड्यापासून स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे.
जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत लेमन ट्री हॉटेल्स कंपनीने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीने अंदाजित लक्ष्यापेक्षा अधिक महसूल आणि EBITDA साध्य केले आहे. 2022-23 मध्ये कंपनीने 880 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आणि 450 कोटी रुपये EBITDA पातळी गाठली होती.
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजच्या मते आर्थिक वर्ष 2023 हे लेमन ट्री कंपनीसाठी पुनर्प्राप्तीचे वर्ष होते. आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनी आपल्या व्यापार विस्तार योजना, कर्ज कमी करण्याचे धोरण, तसेच मागणी आणि पुरवठ्यातील फरक यावर लक्ष केंद्रित करणार आहे. ब्रोकरेज फर्मनुसार FY2023 आणि FY2027 दरम्यान मागणी 10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
कंपनीच्या विस्तार योजना
मार्च 2025 पर्यंत कंपनी 2800 रूम्स वाढवण्याची योजना आखत आहे. कंपनी FY25 पासून कर्ज कमी करण्याचे देखील प्रयत्न करणार आहे. मुंबई विमानतळ हॉटेलसाठी 300 कोटी रुपयांचा प्रलंबित भांडवली खर्च मार्च 2024 पर्यंत सुपूर्द केला जाईल. या सर्व कारणांमुळे, ब्रोकरेज फर्मने लेमन ट्री स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 137 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. मात्र, मागणीतील मंदी आणि रूमचे दर आणि महागाई कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावर होऊ शकतो.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.