20 May 2024 5:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 21 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 21 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर
x

Tejas Networks Share Price | टाटा ग्रूप संबंधित तेजस नेटवर्क्स शेअर खरेदी करावा का? सरकारकडून मिळाली मोठी ऑर्डर

Tejas Networks Share Price

Tejas Networks Share Price | तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच तेजस नेटवर्क्स कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार कंपनीला 96 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. NewSpace India या सरकारी कंपनीने तेजस नेटवर्क्स कंपनीची उपकंपनी असलेल्या SAANKHYA LABS कंपनीला ही ऑर्डर दिली आहे. आज सोमवार दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी तेजस नेटवर्क्स कंपनीचे शेअर्स 1.52 टक्के घसरणीसह 820.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तेजस नेटवर्क ही कंपनी टाटा समूहाचा भाग म्हणून ओळखली जाते. तेजस नेटवर्क्स ही कंपनी वायरलेस नेटवर्किंग मुख्यतः दूरसंचार सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी ISP म्हणजेच इंटरनेट सेवा प्रदाता म्हणून देखील व्यवसाय करते. तेजस नेटवर्क्स कंपनी भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम करते. मागील तीन महिन्यांपासून तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत होता.

आज देखील या कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहेत. मागील तीन महिन्यात तेजस नेटवर्क्स कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला होता. मागील तीन वर्षांत तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 600 टक्के परतावा कमावून दिला आहे.

FII ने तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. परकीय संस्थागत गुंतवणूकदारांनी मार्च 2023 पर्यंत तेजस नेटवर्क्स कंपनीचे 10.49 टक्के भाग भांडवल धारण केले होते. जून 2023 तिमाहीत परकीय गुंतवणूकदारांचे भाग भांडवल प्रमाण 10.91 टक्क्यांवर पोहचले होते.

सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत हे प्रमाण वाढून 11.11 टक्केवर गेले होते. DII अर्थात देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देखील तेजस नेटवर्क्स कंपनीच्या शेअरमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. जून 2023 तिमाहीत DII ने तेजस नेटवर्क्स कंपनीचे 3.89 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सप्टेंबर 2023 च्या तिमाहीत हे प्रमाण वाढून 4.03 टक्क्यांवर पोहचले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tejas Networks Share Price NSE 11 December 2023.

हॅशटॅग्स

Tejas Networks Share Price(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x