1 May 2025 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Trident Share Price | 26 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, महत्वाचे संकेत, यापूर्वी 5238% परतावा दिला - NSE: TRIDENT NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA
x

LIC Share Price | मागील 1 महिन्यात 30 टक्के परतावा देणारा LIC शेअर लवकरच अजून 25 टक्के परतावा देईल

LIC Share Price

LIC Share Price | शेअर बाजाराची नवीन वर्षाची सुरुवात किंचित विक्रीच्या दबावसह झाली आहे. मागील वर्षी भारतीय शेअर बाजाराने जबरदस्त तेजीचे प्रदर्शन केले होते. जगातील इतर शेअर बाजाराच्या तुलनेत भारतीय शेअर बाजाराची कामगिरी उत्तम राहिली आहे. सरकारी क्षेत्रातील कंपनीच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे.

ब्रोकरेज फर्म Citi ने भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणून ख्याती असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 25 टक्के नफा कमावून देऊ शकतात. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी LIC स्टॉक 2.42 टक्के घसरणीसह 838 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

ब्रोकरेज फर्मने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, LIC कंपनी आपल्या मार्केट सेगमेंटमध्ये लीडर म्हणून ओळखली जाते. या कंपनीने आपल्या मार्केट सेगमेंटचा 58.5 टक्के कंपोझिट मार्केट शेअर काबीज केला आहे. एलआयसी कंपनी आता नॉन-पार्टिसिपेटेड सेगमेंटवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. या सेगमेंटमध्ये अधिक मार्जिन असल्याने कंपनीने आपले लक्ष तिकडे वळवले आहे. मागील 6 महिन्यात एलआयसी कंपनीने 3 नवीन स्कीम लाँच केल्या आहेत.

शेअर बाजारातील अनेक तज्ञ एलआयसी कंपनीच्या स्टॉकवर उत्साही आहेत. तज्ञांच्या मते एलआयसी स्टॉक अल्पावधीत 1045 रुपये किमतीवर जाऊ शकतो. सध्या एलआयसी स्टॉक 14.1 च्या PE वर ट्रेड करत आहे. नुकताच भारत सरकारने एलआयसी कंपनीला किमान शेअरहोल्डिंगमध्ये सूट दिली होती. त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत खरेदीचे संकेत मिळत आहे. तज्ञांनी या स्टॉकवर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी 1045 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.

2024 या नवीन वर्षाच्या पहिल्याच एलआयसी कंपनीच्या शेअरने तुफान तेजीसह आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एलआयसी स्टॉक 861.90 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील 6 महिन्यांत एलआयसी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 36 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 02 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या