12 December 2024 2:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL
x

Adani Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअरने अल्पावधीत दिला 64 टक्के परतावा, शेअरमध्ये वेळीच एंट्री घेणार?

Adani Gas Share Price

Adani Gas Share Price | मागील आठवड्यात अदानी समूहाचा भाग असलेल्या लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत होती. अदानी समुहाच्या विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये जवळपास 20 ते 65 टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली होती.

अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरमध्ये 64.92 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स जबरदस्त वाढीसह 1156.80 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी 4.42 टक्के घसरणीसह 1,120.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका आठवड्यात अदानी ग्रीन कंपनीच्या शेअरने देखील मजबूत कामगिरी केली होती. अवघ्या एका आठवड्यात अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 51 टक्क्यांपेक्षा जास्त मजबूत झाला होता. या कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात 1026.50 रुपयेवरून वाढून 1550.30 रुपये किमतीवर पोहचले होते. अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या शेअरमध्ये एका आठवड्यात 32.39 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. तर एका आठवड्यात हा स्टॉक 1131.50 रुपये किमतीवर पोहचला होता.

मागील एका आठवड्यात अदानी पोर्ट आणि अदानी पॉवर कंपनीच्या शेअरने 23.57 टक्के आणि 21.21 टक्क्यांची उसळी घेतली होती. अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरने मागील एका आठवड्यात 827.80 रुपयेवरून वाढून 1022.92 रुपये किमतीवर पोहचले होते. तर अदानी पॉवर कंपनीच्या शेअरची किंमत 44.40 रुपयेवरून वाढून 589.45 रुपये किमतीवर पोहचली होती. आज मंगळवार दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.86 टक्के घसरणीसह 521.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी एंटरप्रायझेस या अदानी समूहाचा भाग असलेल्या प्रमुख कंपनीचे शेअर्स मागील एका आठवड्यात 20 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 2362.70 रुपयेवरून वाढून 2822.15 रुपये किमतीवर पोहोचले आहेत.

या कालावधीत अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 3154.55 रुपये या आठवड्यातील उच्चांक किमतीवर देखील पोहचले होते. यासह अदानी समूहाचा भाग असलेल्या एसीसी, अंबुजा सिमेंट, अदानी विल्मार या कंपन्याचे शेअर्स देखील एका आठवड्यात 11 ते 12.50 टक्क्यांनी वाढले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Gas Share Price NSE 12 December 2023.

हॅशटॅग्स

Adani Gas Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x