
LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड उलाढाल पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्सने नुकताच 1000 रुपये किमतीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. जागतिक ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने देखील एलआयसी कंपनीच्या शेअर्सचे रेटिंग अपग्रेड करून टार्गेट प्राईस वाढवली आहे.
मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी देखील एलआयसी शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. मागील एका वर्षात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 1.47 टक्के वाढीसह 1,026.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जेपी मॉर्गन फर्मने एलआयसी स्टॉकचे रेटिंग ‘न्यूट्रल’ वरून ‘ओव्हरवेट’ असे अपग्रेड केले आहे. तज्ञांनी या स्टॉकची टारगेट प्राईस 690 रुपये किमतीवरून 1340 रुपये वाढवली आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 1081 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तज्ञांच्या मते, सध्याच्या किमतीवरून हा स्टॉक आणखी 25 टक्के वाढू शकतो.
मागील 6 महिन्यांत एलआयसी स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मच्या तज्ञांनी एलआयसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देऊन टार्गेट प्राईस 1,270 रुपये निश्चित केली आहे. मागील 12 महिन्यांत एलआयसी कंपनीचे शेअर्स 80 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले होते. तर निफ्टी निर्देशांक फक्त 28 टक्क्यांनी वाढला होता.
तज्ञांच्या मते पुढील काळात एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये अशीच तेजी टिकुन राहील. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी आपल्या अहवालात म्हंटले आहे की, एलआयसी कंपनीच्या मार्जिनमध्ये जबरदस्त सुधारणा पाहायला मिळत आहे. काही नवीन योजना लाँच केल्यामुळे पुढील काळात एलआयसी कंपनीला मजबूत फायदा होण्याची शक्यता आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.