LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये जोरदार तेजी, लेटेस्ट अपडेटचा फायदा LIC पॉलिसीधारकांना सुद्धा होणार
LIC Share Price | एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी विमा कंपनीचा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. मागील सात वर्षांत एलआयसी कंपनीच्या पॉलिसीधारकांना अंतरिम बोनसशी संबंधित 25,464 कोटी रुपये आयकर रिफंड मिळाला आहे.
एलआयसी कंपनीने गुरुवारी सेबीला माहिती दिली को, आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार इन्कम टॅक्स विभागाने 25,464.46 कोटी रुपये रिफंडची नोटीस जारी केली आहे. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 2.55 टक्के वाढीसह 850.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
चालु आर्थिक वर्षात सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये एलआयसी कंपनीने 17,469 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत एलआयसी कंपनीचा निव्वळ नफा 16,635 कोटी रुपये नोंदवला गेला होता. सेबी फाइलिंगनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, एलआयसी कंपनीच्या वैयक्तिक उत्पन्न विभागात नवीन व्यवसाय प्रीमियम 2.65 टक्क्यांच्या वाढीसह 25,184 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच सहामाही कालावधीत एलआयसी कंपनीचा वैयक्तिक उत्पन्न विभागातील नवीन व्यवसाय प्रीमियम 24,535 कोटी रुपये नोंदवला गेला होता.
एलआयसी कंपनीचा नवीन व्यवसाय प्रीमियम हा जीवन विमा कराराच्या पहिल्या पॉलिसी वर्षात देय असलेला प्रीमियम आहे. विमा क्षेत्राची नियामक म्हणून काम करणारी संस्था IRDAI नुसार, पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नाद्वारे मोजल्या जाणार्या मार्केट शेअरच्या संदर्भात, एलआयसी कंपनीने जीवन विमा व्यवसायाचा जवळपास 58.50 टक्के वाटा काबीज केला आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या सहामाहीत एलआयसी कंपनीचा वैयक्तिक व्यवसायातील वाटा 40.35 टक्के होता. आणि आणि विमा क्षेत्रातील समूह व्यवसायात एलआयसी कंपनीचा एकूण वाटा 70.26 टक्के होता.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 0.72 टक्क्यांच्या घसरणीसह 828 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 12 जानेवारी 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात एलआयसी स्टॉक 1 टक्क्यांनी घसरला होता. कारण एलआयसी कंपनीला मुंबईतील आयकर कार्यालयाने 3,528.75 कोटी रुपये रिफंड बाबत दोन मागणी पात्र पाठवले होते. आज मात्र एलआयसी स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | LIC Share Price NSE Live 15 January 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News