13 December 2024 2:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

LIC Share Price | LIC शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, होणार मोठी कमाई, टार्गेट प्राइस अपडेट

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनीचे शेअर्स मंगळवारी फोकसमध्ये आले होते. या कंपनीच्या शेअर्सने 5 टक्के अप्पर सर्किट हीट केला होता. त्यानंतर अनेक ब्रोकरेज कंपन्यानी एलआयसी स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. नुवामा टेक्निकल डेस्कने एलआयसी स्टॉक 25-40 टक्के वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ( एलआयसी कंपनी अंश )

एलआयसी या सरकारी विमा कंपनीचे एकूण बाजार भांडवल 7.01 लाख कोटी रुपये आहे. एलआयसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1.175 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 597.65 रुपये होती. मंगळवार दिनांक 16 जुलै 2024 रोजी एलआयसी स्टॉक 4.27 टक्के वाढीसह 1,105.55 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

फेब्रुवारी 2024 मध्ये एलआयसी स्टॉक आपल्या विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचला होता. या किमतीवरून हा स्टॉक 25 टक्क्यांनी घसरला आहे. शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, एलआयसी स्टॉकने 1080-1090 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. दैनिक चार्टवर स्टॉक MACD निर्देशकात तेजीचा क्रॉसओव्हर पॅटर्न तयार करत आहे.

शेअर बाजारातील तज्ञांनी एलआयसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 1360 रुपये आणि त्यानंतर 1520 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तज्ञांच्या मते, हा स्टॉक गुंतवणुकदारांना सध्याच्या किमतीच्या तुलनेत 37 टक्के अधिक परतावा कमावून देऊ शकतो. गुंतवणूकदारांनी एलआयसी स्टॉक खरेदी करताना 1005 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे.

मागील एका महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 5 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 24 टक्के वाढवले आहेत. 2024 या वर्षात एलआयसी स्टॉक आतापर्यंत 30 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 78 टक्के मजबूत झाली आहे. मागील दोन वर्षांत गुंतवणूकदारांनी एलआयसी स्टॉकमधून 56 टक्के नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 17 July 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x