15 December 2024 3:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

RPG Life Sciences Share Price | मालामाल करणारा शेअर! 230 टक्के परतावा आणि 150 टक्के डिव्हीडंड, हा स्टॉक खरेदी करणार?

RPG Life Sciences Share Price

RPG Life Sciences Share Price | ‘RPG लाईफ सायन्सेस’ या स्मॉल कॅप फार्मा कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 150 टक्के लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. ‘RPG लाईफ सायन्सेस’ कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनी 30 दिवसात गुंतवणूकदारांच्या खात्यात लाभांश जमा करेल.

RPG Life Sciences Limited Stock Price Today on NSE & BSE

RPG लाईफ सायन्सेस कंपनीने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष कालावधीत 120.33 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जो 31 मार्च 2022 मध्ये 105.06 कोटी रुपये होता, ज्यात 14.53 टक्के वाढ झाली आहे. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 10.35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे, जो Q4FY22 मध्ये 7.52 कोटी रुपये होता या कालावधीत निव्वळ नफ्यात 37.63 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीचा ईपीएस 6.26 रुपये होता, जो मागील वर्षाच्या तिमाहीच्या 4.55 रुपयेच्या तुलनेत 37.58 टक्के जास्त आहे.

शेअर्सची किंमत :
RPG लाइफ सायन्सेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 839 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आदल्या दिवसाच्या 819.45 रुपये बंद किंमतीच्या तुलनेत शेअरची किंमत 2.39 टक्के वाढली होती. या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 111.52 टक्के परतावा कमावून दिला आहे.

तर मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 230 टक्के पेक्षा जास्त नफा मिळवून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 57.22 टक्के वाढली आहे. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 1012 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RPG Life Sciences Share Price Today on 01 May 2023.

हॅशटॅग्स

RPG Life Sciences Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x