
LIC Share Price | भारतातील दिग्गज ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालच्या तज्ञांनी भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसी कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांनी एलआयसी कंपनीच्या शेअर्सवर 1270 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी स्टॉक 1055 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
जर तुम्ही सध्याच्या किमतीवर स्टॉक खरेदी केला तर तुम्हाला अल्पावधीत 20 टक्के नफा मिळू शकतो. मागील 1 वर्षात एलआयसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 81 टक्के नफा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 0.74 टक्के वाढीसह 1,048.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1175 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 530.20 रुपये होती. एलआयसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 6,74,655.88 कोटी रुपये आहे. मागील 2 आठवड्यात एलआयसी कंपनीच्या शेअर्समध्ये 1.31 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. तर मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यात एलआयसी कंपनीच्या शेअर्सची किंमत 62 टक्के मजबूत झाली आहे.
12 फेब्रुवारी 2024 रोजी एलआयसी कंपनीने आपले डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. मागील वर्षी याच तिमाहीत एलआयसी कंपनीने 6,334 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर या तिमाहीत कंपनीने 9,444 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत एलआयसी कंपनीचा निव्वळ नफा 49 टक्के वाढला आहे.
मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे निव्वळ प्रीमियम उत्पन्न 1.11 कोटी रुपये होते. तर या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 5 टक्के वाढून 1.17 लाख कोटी रुपयेवर गेले आहे. या सरकारी मालकीच्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 40 टक्के अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हा अंतरिम लाभांश घोषणा केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत गुंतवणुकदारांच्या खात्यात जमा केला जाईल. ट्रेंडलाइन नुसार, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे लाभांश उत्पन्न प्रमाण 0.66 टक्के आहे. LIC स्टॉकचा RSI 63.9 अंकावर आहे. तर स्टॉकचा MFI 74.0 अंकावर आहे.
डिसेंबर 2023 च्या तिमाहीत एलआयसी कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 96.50 टक्के भाग भांडवल धारण केले होते. डिसेंबर तिमाहीत FII/FPI ने आपली होल्डिंग 0.10 टक्केवरून कमी करून 0.06 टक्के केली आहे. म्युच्युअल फंडानी डिसेंबर 2023 च्या तिमाहीत आपली होल्डिंग 0.59 टक्केवरून वाढवून 0.79 टक्के केली आहे. भारताच्या संसदेने 19 जून 1956 रोजी आयुर्विमा महामंडळ कायदा संमत करून 1 सप्टेंबर 1956 रोजी एलआयसी कंपनीची स्थापना केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.