 
						LIC Share Price | लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC या सरकारी विमा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीच्या शेअर्समध्ये मागील 4 दिवसापासून तेजी पाहायला मिळत आहे.
या विमा कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 754.40 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 530.20 रुपये होती. आज गुरूवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 679.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये LIC कंपनीचे शेअर्स 27 जानेवारी 2023 च्या उच्चांक किमतीवर पोहचले होते. सर्वोच्च सध्या हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 30 टक्के मजबूत झाला आहे. 29 मार्च 2023 रोजी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स 530.20 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. एलआयसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4,31,335 कोटी रुपये आहे.
सध्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे शेअर्स आपल्या IPO मधील इश्यू किमतीपेक्षा कमी किमतीवर ट्रेड करत आहेत. IPO मध्ये LIC कंपनीच्या शेअर्सची किंमत बँड 902-949 रुपये निश्चित करण्यात आली होत. LIC विमा कंपनीचे IPO शेअर्स 949 रुपये किंमत बँडवर वाटप करण्यात आले होते.
एलआयसी कंपनीच्या शेअरने लिस्टिंगमध्ये आपल्या गुंतवणूकदारांना निराश केले होते. शेवटी या कंपनीचे शेअर्स 867.20 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचा IPO एकूण 2.95 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		