5 May 2024 8:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bonus Shares | ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक प्राईस देखील स्वस्त, स्टॉक खरेदीला गर्दी Adani Port Share Price | अदानी पोर्ट्स शेअर बक्कळ कमाई करून देणार, अल्पावधीत मिळेल 33 टक्के परतावा IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, गुंतवणुकीची संधी सोडू नका PSU Stocks | मल्टिबॅगर PSU शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार! कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस सुसाट वाढणार Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Federal Bank Share Price | या खाजगी बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांना लखपती बनवले, FD सोडा आणि बँकिंग स्टॉक खरेदी करा

Multibagger Stock

Federal Bank Share Price | फेडरल बँकेच्या शेअरने लाँग टर्म साठी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. एवढेच नाही तर या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत ही लोकांना मजबूत परतावा दिला आहे. मागील सात महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. जानेवारी 2023 मध्ये या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मागील चार महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 10 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.

ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ज्ञांच्या मते, फेडरल बँकेचे शेअर्स सध्याच्या किंमत पातळीवरून 32 टक्क्यांनी वाढू शकतात. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फेडरल बँकेचे शेअर्स 129.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मार्च 2023 च्या तिमाही शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, दिग्गज गुंतवणुकदार रेखा झुनझुनवाला यांनी फेडरल बँकेचे 2.31 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

39 म्युच्युअल फंडांनी फेडरल बँकेचे 33.99 टक्के,आणि व्यापारी बँकांनी 0.17 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. यासोबत 19 विमा कंपन्यांनी फेडरल बँकेचे 7.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.

22 वर्षात दिला 10711 टक्के परतावा :
फेडरल बँकेचे शेअर्स 11 मे 2001 रोजी 1.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 9 मे 2023 रोजी हा स्टॉक 129.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील 22 वर्षांत या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 10711 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 1.08 कोटी रुपये झाले आहे. 26 मे 2022 रोजी हा स्टॉक 82.50 रुपये या आपल्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तर 16 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 74 टक्क्यांनी वाढून 143.35 रुपयांवर पोहचला होता.

फेडरल बँकेचा तिमाही नफा :
मार्च तिमाहीत फेडरल बँकेच्या निव्वळ नद्यात वार्षिक 67 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. बँकेने तिमाही दर तिमाहीत 12 टक्के वाढीसह 903 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. उच्च उत्पन्न आणि कमी क्रेडिट खर्चामुळे निव्वळ नफा अंदाजापेक्षा 10 टक्क्यांनी अधिक आला आहे. निव्वळ व्याज उत्पन्न वार्षिक आधारावर 25 टक्के आणि त्रैमासिक आधारावर 2 टक्के कमी म्हणजे 1904 कोटी रुपये नोंदवले गेले आहे.

मार्जिन 1.8 टक्क्यांवरून घसरून 3.31 टक्क्यांवर आला आहे. मजबूत पुनर्प्राप्ती आणि सुधारणांमुळे फेडरल बँकेची मालमत्ता गुणवत्ता स्थिर राहिली आहे. त्यामुळे मार्च 2023 चा तिमाही निकाल फेडरल बँकेसाठी संमिश्र होता. ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांनी विश्वास व्यक्त केला आहे की, फेडरल बँकेचा आरओए पुढील काळात 1.2 टक्क्यांवर जाऊ शकतो. ब्रोकरेज फर्मने 170 रुपयेच्या लक्ष्य किंमतीसाठी फेडरल बँकचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Federal Bank share price today on 11 May 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x